• 27 Mar, 2023 06:51

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group Stocks: अदानींच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांना अप्पर सर्किट; तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कोणता शेअर आहे?

Adani Groups Stocks Rise

Adani Group Stocks: अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज (दि. 6 मार्च) जोरदार खरेदी होत आहे. मार्केट सुरू झाल्यानंतर दुपारी 12 च्या आतच अदानींच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागले आहे. उर्वरित 4 पैकी 3 कंपन्या तेजीमध्ये आहेत; तर फक्त एका कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होत असल्याचे दिसून येते.

Adani Group Stocks: अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स मागील काही महिन्यात धडाधड कोसळत होते. पण सोमवारी (दि. 6 मार्च) सकाळपासून अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी होत आहे. मार्केट सुरू झाल्यानंतर  दुपारी 12 च्या आतच अदानींच्या 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागले आहे. उर्वरित 4 पैकी 3 कंपन्या तेजीमध्ये आहेत; तर फक्त एका कंपनीच्या शेअरमध्ये घसरण होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अदानी ग्रुपमधील कोणत्या कंपनीचा शेअर आहे, ते एकदा तपासून घ्या.

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहातील कंपन्यांमध्ये जोरदार घसरण झाली होती. पण मागील आठवड्यात शुक्रवारी (दि. 4 मार्च) आणि सोमवारी (दि. 6 मार्च) अदानी समुहातील कंपन्यांमध्ये जोरदारी खरेदी झाल्याचे दिसून आले. अमेरिकेतील गुंतवणूकदार कंपनी जीक्यूसी पार्टनरने (GQC Partners) अदानी समुहातील कंपन्यांमध्ये सुमारे 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर गोल्डमॅन सॅचने (Goldman Sachs) 1135 कोटी रुपये अदानी समुहातील कंपन्यांमध्ये गुंतवण्याबाबत बोलणी केली आहेत. या दोन सकारात्मक बातम्यांमुळे अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे.

अदानी समुहातील कंपन्यांची स्थिती जाणून घ्या!

अदानी पॉवर (Adani Power) 177.90 रुपये, अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) 780.90 रुपये, अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) 590.10 रुपये, अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) 820.90 रुपये, अदानी विल्मर (Adani Wilmar) 439.20 रुपये आणि एनडीटीव्ही (NDTV) 231.10 रुपयांवर ट्रेडिंग करत आहेत. यातील काही शेअर्स हे 5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले असून त्यांना अप्पर सर्किट लागले आहे. याचा अर्थ आज शेअर मार्केटमध्ये या कंपन्यांचे शेअर्स विकणारे Sellers नाहीत.

Adani Enterprises Stock 6 March 2023
Source: www.money.rediff.com

अदानी समुहातील मुख्य कंपनी अदानी इंटरप्रायजेस (Adani Enterprises) 11.48 टक्क्यांनी वाढ आहे. बीएसईवर त्याची किंमत 2095.15 रुपये होती. तर अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Port & Special Economic Zone) या कंपनीचा शेअर 2.98 अंकांनी वाढून 704.75 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.  अंबुजा सिमेंट (Ambuja Cements) 0.26 टक्क्यांनी वाढून 393 रुपये झाला आहे. तर एसीसी सिमेट कंपनीच्या शेअर्समध्ये किरकोळ 0.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

गोल्डमॅन सॅच आणि जीक्यूसीची गुंतवणूक

गोल्डमॅन सॅच कंपनीने अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 504.60 रुपये असताना, गोल्डमॅनने त्या किमतीने 2,25,22,850 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. यासाठी कंपनीने सुमारे 1135 कोटी रुपये गुंतवले आहेत. तर दुसरीकडे जीक्यूसी पार्टनरने अदानी ग्रुपमधील 4 कंपन्यांमध्ये 15,446 कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यात प्रामुख्याने अदानी इंटरप्रायजेसमध्ये 5460 कोटी रुपये, अदानी पोर्ट्समध्ये 5282 कोटी रुपये, अदानी ट्रान्समिशनमध्ये 1898 कोटी रुपये आणि अदानी ग्रीन एनर्जी कंपनीत 2806 कोटी रुपये गुंतवले आहेत.

सर्वोच्य न्यायालयाचा अदानी पॉवरला दिलासा

आज सकाळपासून अदानी समुहातील कंपन्यांमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. त्यात आज सर्वोच्य न्यायालयाने अदानी पॉवर कंपनीच्या विरोधात सुरू असलेल्या याचिकेवर आज सकारात्मक निर्णय दिला आहे. तर दुसरीकडे अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीच्या रेटिंगमध्ये आयसीआरएने कपात केली आहे. त्यामुळे आजचा दिवस अदानी समुहाचा असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (MSEDCL) कंपनीने अदानी पॉवरच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज कोर्टाने अदानी पॉवरच्या बाजूने  निकाल दिला आहे. 2008 मध्ये MSEDCL ने अदानी पॉवर कंपनीसोबत दीर्घकाळासाठी वीज खरेदी करण्याचा करार केला आहे.