कोणती वेळ कशी येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या सुरक्षिततेचा पर्याय म्हणून मौल्यवान वस्तू किंवा महत्वाच्या कागदपत्रांसाठी बरेच जण बॅंकेतील लाॅकरचा पर्याय निवडतात. पण, त्याआधी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. जसे की, लाॅकरशी संबंधित व्यवहार खाजगी आणि गोपनीय आहेत की नाही.
तसेच लाॅकरमध्ये किती वेळा प्रवेश मिळतो. याशिवाय लाकॅरमध्ये ठेवलेली कागदपत्रं सुरक्षित राहतील, याची ही खात्री करणे आवश्यक आहे. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. त्यातील महत्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. याच गोष्टी बॅंक लाॅकरला खास बनवतात.
Table of contents [Show]
बॅंक लोकेशन
लाॅकर रेंटने घ्यायचे असल्यास, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन आहे. कारण, प्रत्येक बॅंकेची शाखा लाॅकरची सुविधा देत नाही. त्यामुळे बॅंकेत लाॅकर घेण्याआधी त्या शाखेत लाॅकरची सुविधा तसेच, तुम्हाला येण्या-जाण्याला सोयीस्कर आहे की नाही हे पाहणे आवश्यक आहे.
लॉकरचा आकार
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाॅकरची साईज (आकार), ती तुम्ही गरजेनुसार निवडू शकता. बँकेत या सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या वस्तूनुसार तुम्ही त्याच साईजचे लाॅकर घेऊ शकता.
लाॅकरसाठी उपलब्धता
तुम्ही एखाद्या शाखेत लाॅकर घेतल्यावर, तुम्हाला काही ठेवायचे असेल किंवा काढायचे असेल तर अशावेळी किती वेळ वाट पाहावी लागू शकते. यासाठी तुम्ही चौकशी करु शकता. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेत गर्दी नसेल अशावेळी येऊन तुमच्या लाॅकरचा वापर करु शकता.
लाॅकरचे चार्जेस
लाॅकर रेंटवर घ्यायच्याआधी त्यासाठी किती वार्षिक चार्जेस द्यावे लागणार आहे याची विचारणा करा. कारण, लाॅकरची साईज आणि लोकेशननुसार बॅंकांचे वेगवेगळे चार्जेस असू शकतात. त्यामुळे एक-दोन बॅंकांची तुलना करुन घेतल्यास, तुम्ही फायद्यात राहू शकता.
सुरक्षा महत्वाची
तुम्ही बॅंकेत तुमच्या मौल्यवान वस्तू आणि कागदपत्रं सुरक्षित ठेवण्यासाठी लाॅकर घेत आहात. त्यामुळे लाॅकरमधील मालमत्तेची सुरक्षितता देणारी बॅंक निवडा. त्यामुळे भविष्यात तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.
नॉमिनीची माहिती आवश्यक
तुम्ही महत्वाच्या वस्तू लाॅकरमध्ये ठेवत असल्याने तुमच्या गैरहजेरीत किंवा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास कोणाला तरी लाॅकरमध्ये प्रवेश देणे गरजेचा असतो. त्यामुळे नाॅमिनीची माहिती देणे आवश्यक असणार आहे.
अॅग्रीमेंट समजून घ्या
लाॅकर घेताना बॅंकेने दिलेले अॅग्रीमेंट वाचा आणि समजून घ्या. तसेच, चोरी झाली किंवा नुकसान झाल्यास बॅंकेने त्याच्या नुकसान भरपाईसाठी काय अटी व शर्ती दिल्या आहेत तेही समजून घ्या. त्यामुळे भविष्यात तशी घटना घडल्यास त्यापासून तुम्हाला सुरक्षितता मिळणार असल्याची खात्री राहिल. तसेच, इतरही महत्वाच्या गोष्टी समजून घेणे, तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते.