तुम्ही म्हणाल स्माॅल फायनान्स बॅंका एवढा कसा व्याजदर देताय. तर यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. मात्र, यातील महत्वाचा घटक म्हणजे ग्राहकांचा बेस वाढवणे आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करणे हा आहे. तसेच, या स्माॅल बॅंकांचा ऑपरेशनल खर्च कमी असतो. त्यामुळे देखील या बॅंका एवढे व्याज देण्यास सक्षम असतात. त्यामुळे तुम्ही देखील या बॅंकांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सूक असाल तर त्या बॅंकांविषयी जाणून घेऊया.
Table of contents [Show]
सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंक
तीन वर्षांच्या एफडीवरील सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या स्मॉल फायनान्स बॅंकांमध्ये सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंकेचा (Suryoday Small Finance Bank) पहिला नंबर लागतो. सध्या तीन वर्षांच्या एफडीवर बॅंक 8.6 टक्के प्रभावी व्याजदर देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंकेच्या एफडीमध्ये जर तुम्ही तीन वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक वाढून 1.29 लाख रुपये होईल. विशेषत: ज्यांना विना रिस्क चांगला रिटर्न मिळवायचा आहे. त्यांच्यासाठी या ठिकाणी गुंतवणूक करणे फायद्याचे ठरु शकते.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅंक
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बॅंक (Utkarsh Small Finance Bank) देखील तीन वर्षांच्या एफडीवर 8.5 टक्के आकर्षक व्याजदर देत आहे. त्यामुळे तुम्ही या बॅंकेच्या एफडीमध्ये तीन वर्षांसाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक 1.29 लाख रुपये होईल. ही बॅंकही सूर्योदय स्मॉल फायनान्स बॅंके एवढाच रिटर्न देत आहे. त्यामुळे रिस्क टाळणारे गुंतवणुकदार या बॅंकेत गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवू शकतात.
एयू स्मॉल फायनान्स बॅंक
एयू स्मॉल फायनान्स बॅंक (AU Small Finance Bank) सध्या तीन वर्षांच्या एफडीवर 8 टक्के व्याजदर देत आहे. समजा तुम्ही जर या बॅंकेत एफडीमध्ये तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला मुदत संपल्यावर 1.27 लाख रुपये मिळतील. ही नवीन बॅंक असूनही, गेल्या काही वर्षांत बॅंकेने प्रगतीचा जोर पकडला आहे. त्यामुळे बॅंकेचे नाव काही वर्षांतच ग्राहकांपर्यंत पोहचले आहे.
इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंक
इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंक सुद्धा (Equitas Small Finance Bank) तीन वर्षांच्या एफडीवर 8 टक्के व्याजदर देत आहे. तुम्ही या बँकेच्या एफडीमध्ये तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक 1.27 लाख रुपये होईल. त्यामुळे या बॅंकेतही तुम्ही गुंतवणुकीची संधी घेऊ शकता.
स्माॅल बॅंका असल्या तरी अल्पावधीतच बॅंकांनी मार्केटमध्ये आपला जम बसवला आहे. त्यामुळे या बॅंकांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण ही वाढले आहे. तरी देखील तुम्हाला गुंतवणूक करायची असल्यास अजूनही बॅंकांचे व्याजदर पाहून किंवा त्यांची तुलना करुन गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. कारण, प्रत्येक बॅंकांचे व्याजदर कमी जास्त राहू शकतात.