Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI MPC Meet: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची उद्या बैठक, रेपो दर 'जैसे थे'च राहणार

RBI Monetary Policy

RBI MPC Meet: रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 6.50% इतका आहे. महागाई नियंत्रणासाठी मागील वर्षभरात आरबीआयने रेपो दरात 2.50% वाढ केली होती. त्याचे परिणाम आता दिसून आले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात महागाईचा पारा खाली आला. महागाईचा पारा कमी झाल्याने यंदाच्या पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवण्याची शक्यताा जाणकारांनी व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 6 जून 2023 पासून मुंबईत सुरु होणार आहे. आर्थिक वर्षातील ही दुसरी बैठक आहे. गेल्या बैठकीत बँकेने व्याजदर जैसे थेच ठेवले होते. महागाईचा पारा कमी झाल्याने यंदाच्या पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवण्याची शक्यताा जाणकारांनी व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 6.50% इतका आहे. महागाई नियंत्रणासाठी मागील वर्षभरात आरबीआयने रेपो दरात 2.50% वाढ केली होती. त्याचे परिणाम आता दिसून आले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात महागाईचा पारा खाली आला. यामुळे बँकेने गेल्या पतधोरणात व्याजदर जैसे थेच ठेवले होते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये महागाईचा दर आणखी कमी होईल, असा अंदाज यापूर्वीच आरबीआयने व्यक्त केला आहे.

भारतीय स्टेट बँकेने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार 'आरबीआय' व्याजदर वाढीला पूर्णपणे विराम देण्यापूर्वी एकदा जैसे थेच ठेवेल, असे म्हटले आहे. ही एक तात्पुरती सोय आहे. मात्र महागाई अपेक्षेनुसार कमी झाली तर बँकेकडून पतधोरण शिथिल केले जाईल, असे बँकेने म्हटले आहे.

दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने बँकिंग क्षेत्रात रोकड सुलभता वाढली आहे. यामुळे आरबीआयकडून पतधोरणात रोकड सुलभतेसाठी यापूर्वी केलेल्या उपाययोजना कमी केल्या जाण्याची शक्यता 'एसबीआय'ने व्यक्त केली आहे.

'एसबीआय'च्या अहवालानुसार बाजारात 1 जून 2023 अखेर 2.1 लाख कोटींची रोकड सुलभता आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हे प्रमाण 2.1 लाख कोटी इतके होते. येत्या काही महिन्यात रोकड तरलता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह देखील लवकरच पतधोरण जाहीर करणार आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणाबाबत निर्णय घेईल. मॉन्सूनचा अंदाज, कृषी क्षेत्राची कामगिरी आणि महागाई या घटकांचा आगामी पतधोरणात विचार केला जाणार आहे.

कर्जाचा ईएमआय वाढणार का?

रिझर्व्ह बँकेने मागील पतधोरणात प्रमुख व्याजदरात कोणाताही बदल केला नव्हता. यामुळे कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र मागील वर्षभरात आरबीआयने रेपो दर 2.50% वाढवला. ज्याचा फटका विद्यमान कर्जदारांना आणि नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसला. रेपो दरवाढीनंतर बँकांनी कर्जाचे दर वाढवले. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज अशी सर्वच प्रकारची कर्जे 2 ते 4% ने वाढली. कर्जदारांना कर्जाचा वाढीव हप्ता भरताना जादा पैशांची तजवीज करावी लागली. आगामी पतधोरणाकडे कर्जदार डोळे लावून बसले आहेत. आरबीआयने व्याजदर जैसे थेच ठेवावा अशी अपेक्षा कर्जदारांकडून व्यक्त केली जात आहे.