Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMJDY : जनधन बँक खात्यांची संख्या 50 कोटींच्या पुढे; खात्यांमधील ठेवी 2.03 लाख कोटींवर

PMJDY : जनधन बँक खात्यांची संख्या 50 कोटींच्या पुढे; खात्यांमधील ठेवी 2.03 लाख कोटींवर

Image Source : www.aninews.in

या योजनेतून खाते उघडणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 50 कोटी खातेदारांपैकी 56 टक्के जनधन खाती ही महिलांची आहेत. तसेच यामध्ये 67 टक्के खाती ग्रामीण, निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. जनधन योजनेमुळे अनेक नागरिक बँकिंग व्यवहाराशी जोडले गेले आहेत.

ऑगस्ट 2014 मध्ये सुरू झालेल्या पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत (janDhan scheme)अनेक भारतीयांनी बँकेत आपले खाते उघडले. झिरो बँलन्सवर उघडण्यात येणाऱ्या या खात्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 9 ऑगस्टपर्यंत पंतप्रधान जन धन योजनेतून (PMJDYसुरु करण्यात आलेल्या बँक खात्याचा आकडा हा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. अर्थ मंत्रालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

काय आहे पंतप्रधान जन धन योजना?

पंतप्रधान जन धन योजना ही 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरूवात झालेली बँकिंग सेवा देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून भारतीय नागरिकाला झिरो बँलन्सवर बँकेमध्ये आपले खाते उघडता येते. तसेच या खात्याच्या माध्यमातून कोणतेही आर्थिक व्यवहार करणे, बचत आणि मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवता येतात. तसेच केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेची आर्थिक रक्कम या खात्यामध्ये वितरीत करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. जनधन योजना केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

56 टक्के जनधन खाती महिलांची

या योजनेतून खाते उघडणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून 50 कोटी खातेदारांपैकी 56 टक्के जनधन खाती ही महिलांची आहेत. तसेच यामध्ये 67 टक्के खाती ग्रामीण, निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत. जनधन योजनेमुळे अनेक नागरिक बँकिंग व्यवहाराशी जोडले गेले आहेत.

2.03 लाख कोटीच्या ठेवी-

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एकूण जनधन खात्यातील ठेवींच्या रकमेचा आकडा हा 2.03 लाख कोटी रुपयांच्या वर आहे. तसेच PMJDY खात्यांमध्ये सरासरी शिल्लक रक्कम ही प्रत्येकी 4,076 रुपये इतकी आहे. 50 कोटी खात्यापैकी 5.5 कोटींहून जास्त खात्यांना DBT अंतर्गत लाभ मिळत आहेत. तसेच केंद्र सरकारने आत्तापर्यंत या जनधन खातेधारकांपैकी सुमारे 34 कोटी खाते धारकांना रूपे कार्ड विनामूल्य प्रदान केले आहे. या शिवाय या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे.