एफडी म्हटल्यावर रिटर्न मिळण्याची हमी असतेच. तसेच, तुमचा पैसा ही सुरक्षित राहतो. त्यामुळे बरेच जण एफडीला प्राधान्य देतात. तुमचेही DCB (डेव्हलपमेंट क्रेडिट बॅंक) बॅंकेत खाते असल्यास तुम्हाला ही चांगला रिटर्न मिळवता येणार आहे. कारण, बॅंक 7 दिवस ते 120 महिन्यांच्या मुदतीत 3.75 टक्के ते 7.90 टक्के व्याजदर देत आहे.
तर याच मुदतसाठी ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के ते 8.50 टक्के व्याजदर मिळत आहे. त्यामुळे एफडीच्या मुदतीनुसार दर वेगवेगळे असू शकतात. बॅंकेने या महिन्यात दुसऱ्यांदा दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीच्या दरात बदल केला आहे.
बॅंकेचे नवे व्याजदर
बॅंक सामान्य नागरिकांना दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर बॅंक 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदतीसाठी 3.75 टक्के व्याज देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4.25 टक्के देत आहे. तसेच, 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर बॅंक सामान्यांना 4 टक्के व्याजदर देत आहे. तर याच मुदतीवर ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्के व्याज देत आहे. त्याचप्रमाणे 12 महिन्यांसाठी सामान्य नागरिकांना 7.15 टक्के व्याज देत आहे. तर याच मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज देत आहे.
12 महिने आणि 1 दिवस ते 12 महिने आणि 10 दिवसांच्या मुदतीच्या एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे. या मुदतीसाठी बॅंक सामान्य नागरिकांना 7.75 टक्के व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के व्याज देत आहे. जर एफडी 25 ते 26 महिन्यांनंतर मॅच्युअर झाली तर यावर सामान्य नागरिकांना 7.90 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के व्याजदर दिल्या जाणार आहे.
बचत खात्यावर मिळतोय 8 टक्के व्याज
DCB ने बचत खात्यांवरील व्याजदरात ही बदल केला आहे. बॅंक रकमेनुसार 1.75 टक्के ते 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. तेच 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 2 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर बॅंक 3 टक्के व्याजदर देत आहे. तर 10 लाखांपेक्षा जास्त ते 2 कोटींपेक्षा कमी रकमेवर तुम्हाला 8 टक्के व्याज दर दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर मोठी रक्कम गुंतवायच्या तयारीत असल्यास तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो.