रिझर्व्ह बँकेच्या हॉलिडे लिस्टनुसार मार्च महिन्यात सण-उत्सवामुळे 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. यातील काही दिवस स्थानिक पातळीवरील सण उत्सवांमुळे बँकांना सुट्टी असेल. दुसरा आणि चौथा शनिवार बँकांना साप्ताहिक सुट्टी असते. होळी, नवरात्री, राम नवमी या उत्सवांमुळे सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. पुढील महिन्यात बॅंक हॉलिडेज पाहून ग्राहकांना बँकेतील कामकाजाने नियोजन करावे लागेल.
मार्च महिन्यात 3 मार्च रोजी चापचर कूटनिमित्त ऐझवाल आणि मिझोरमध्ये बँकांना सुट्टी असेल. 5 मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. 7 मार्च 2023 रोजी होळी निमित्ती मुंबई, कोलकाता, नागपूर, पणजी, रांची, श्रीनगर, हैदराबाद, तेलंगणा, जयपूर या शहरांत बँकांना सुट्टी असेल. 8 मार्च रोजी धुलिवंदन असल्याने अहमदाबाद, अगरतळा, ऐझवाल, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहरादून, गंगटोक, इन्फाळ, नवी दिल्ली, पटना, रायपूर, शिलॉंग, शिमला या ठिकाणी सार्वजनिक सुट्टीमुळे बँका बंद असतील.
पटनामध्ये 9 मार्च रोजी बँकांना रजा असेल. 11 मार्च 2023 रोजी महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँका बंद असतील. 12 मार्च रोजी रविवार साप्ताहिक सुट्टी असेल. त्यानंतर थेट 19 मार्च 2023 रोजी रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बँकांना रजा असेल. 22 मार्च 2023 रोजी गुढी पाडवा असल्याने बँकांना हॉलिडे राहील. 25 मार्च रोजी चौथा शनिवार आणि 26 मार्च रोजी रविवार असे दोन दिवस बँकांना सुट्टी असेल. 30 मार्च 2023 रोजी राम नवमीनिमित्त बँकांना रजा असेल.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बँकांचे कामकाज बंद असले तरी इंटरनेट बँकिंग, एटीएम आणि डिजिटल बँकिंग सेवा मात्र अखंड सुरु राहणार आहे. ग्राहकांना नेट बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येतील.