एयू स्मॉल फायनान्स बँकेला 30 जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 387 कोटींचा नफा झाला आहे. ठेंवीमध्ये 19% वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 47% वाढ झाली. बँकेच्या ठेवींमध्ये 27% वाढ झाली असून ठेवींचा आकडा 69 हजार 315 कोटींवर गेला आहे.
पहिल्या तिमाहीत बँकेच्या सर्व मालमत्ता व ठेवींमध्ये तसेच नफाक्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढ झाली. याला एनआयआयमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी झालेल्या वाढीची जोड मिळाली.
बँकेने या तिमाहीत अनेक उत्पादने बाजारात आणली. एमएसएमई ग्राहकांसाठी रुपे बिझनेस क्रेडिट कार्डस् आणली. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट वेतन खाती उघडण्याची प्रक्रिया आमच्या व्हिडिओ बँकिंग सुविधेद्वारे सुरू केली.
एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल म्हणाले, पहिल्या तिमाहीत व्यापक अर्थव्यवस्थेतील वातावरणात सुधारणा झाली. चलनवाढ सौम्य झाली, चालू खात्यांतील तूट कमी झाली आणि परकीय चलनाच्या साठ्यात वाढ झाली. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्येही सुधारणा झाली आहे आणि पावसाळ्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागांतील कर्जाची मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एयू एसएफबीने मालमत्ता, ठेवी आणि नफाक्षमता यांच्यातील शाश्वत वाढीसह सर्व निकषांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ठेवींच्या किंमतीतील पुनर्रचना तसेच अतिरिक्त रोखता बफर्सवरील नकारात्मक परिणामांमुळे आमच्या ठेवींवर थोडा परिणाम होऊनही बँकेने एकंदर चांगली कामगिरी केली आहे.
- बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 3.75 लाख ग्राहक मिळवले. त्यातील ४५% ग्राहक डिजिटल उत्पादने आले आहेत.
- क्रेडिट कार्डांचा एकूण आकडा 6.1 लाखांवर पोहोचला.
- व्हिडिओ बँकिंगमार्फत मिळवलेल्या ठेवींचा आकडा 1300 कोटींहून अधिक झाला आहे
- तरतूदपूर्व (प्री-प्रोव्हिजनिंग) कार्यात्मक नफा मागील वर्षाच्या तुलनेत 39% वाढून 546 कोटी झाला.
- निव्वळ व्याजातून मिळणारे उत्पन्न २८% वाढून १ हजार २४६ कोटींवर पोहोचले.
- निव्वळ व्याजातून मिळणारा नफा (मार्जिन) 5.7% टक्के राहिला.
- एकूण अॅडव्हान्सेस मागील वर्षाच्या तुलनेत 29% वाढून 63 हजार 635 कोटींवर पोहोचले
- एकूण ठेवींमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 27% वाढ होऊन 69315 कोटींवर पोहोचल्या आहेत.
- सीएएसए गुणोत्तर 35% आहे तर सीएएसए प्लस रिटेल मुदत ठेवी 68% आहेत.
- एकूण भांडवल पर्याप्तता गुणोत्तर 21.5% होते आणि श्रेणी-१ गुणोत्तर तिमाहीतील नफा वगळता 19.9% होते.
- जीएनपीए 1.76% असून, त्यात मागील वर्षाच्या तुलनेत 20 अंशांनी घट झाली आहे. एनएनपीए 0.55% आहे.