Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

डॉ. मनमोहन सिंग : खुल्या अर्थव्यवस्थेचा पाया रचणारे अर्थतज्ज्ञ

देशाच्या खडतर झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan singh) यांनी केले. 1991 ते 96 या कालावधी मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची संपूर्ण दिशाच बदलली. आज 26 सप्टेंबरला डॉ. मनमोहन सिंग यांचा 91 वा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने डॉ. सिग यांनी अर्थव्यवस्थेला दिशा देण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा आढावा

Read More

Festival 2023 : सणासुदीच्या काळात इलेक्ट्रोनिक्स वस्तूंच्या खरेदीत 20% वाढ होण्याची अपेक्षा

फ्लिपकार्ट, अमेझॉन, विजय सेल्स आदी कंपन्यांनी त्यांच्या पोर्टलवर वेगवेगळ्या ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. अमेझॉन Great Indian Festival sale नावाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सेल लाइव करणार असून, फ्लिपकार्ट देखील Big Billion Day Sale साजरा करणार आहे. या दोन्ही सेलमध्ये ग्राहकांना 50 ते 70 टक्के सवलत देण्याची शक्यता आहे.

Read More

Bank Loan घेण्यात पुरुषांपेक्षा महिला सरस, सवलतीचा महिला घेतायेत फायदा

गृहकर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे याचाच अर्थ कमवत्या महिलांची संख्या देखील वाढली आहे. बँका आणि इतर वित्तीय संस्था महिलांना स्वस्तात कर्ज देतात हेही यामागचे एक कारण आहे. याशिवाय कर बचतीचे फायदे देखील महिला कर्जदारांना मिळत असतात.

Read More

National Cinema Day: 13 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन पाहा फक्त 99 रुपयांत सिनेमा

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) देशभरातील चित्रपटगृहांच्या सहकार्याने 13 ऑक्टोबरला येणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट दिनाचे औचित्य साधून 'मूव्ही मॅरेथॉन'चे आयोजन केले आहे. याद्वारे फक्त 99 रुपयांत चित्रपट रसिकांना मॅरेथॉनचा आनंद घेता येणार असल्याची घोषणा चित्रपटगृह चालकांच्या समूहाने केली.

Read More

Indus App Store :’ फोनपे’ने लॉन्च केले इंडस ॲप स्टोअर, Google Play Store ला देणार टक्कर

भारतीयांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फोनपे ने हे ॲप स्टोअर डिझाईन केले आहे. पूर्णतः भारतीय बनावटीचे हे ॲप स्टोअर असून युजर्सला 12 प्रकारच्या भारतीय भाषांचा अनुभव येथे घेता येणार आहे. भारतीय बनावटीच्या वेगवेगळ्या मोबाईल ॲप्सला लिस्टिंग करण्यात इथे मदत केली जाणार आहे.

Read More

Great Indian Festival Sale: 'या' तारखेला सुरू होतोय Amazon चा सेल, 'या' प्रोडक्ट्सवर मिळेल मोठा डिस्काउंट

सध्या सणासुदीमुळे बऱ्यापैकी ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर ऑफर्सची बरसात सुरू आहे. Amazon ने सुद्धा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख जाहीर केली आहे. अ‍ॅमेझाॅन या सेलमध्ये फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्के, स्मार्टवॉच आणि हेडफोनवर 75 टक्के आणि लॅपटॉपवर 40,000 रुपयांपर्यंत मोठा डिस्काउंट देण्याच्या तयारीत आहे. तसेच, टॅब्लेटवर देखील 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे.

Read More

FPI Outflow: परदेशी गुंतवणुकदारांचा भांडवली बाजारातून काढता पाय; तीन आठवड्यात हजारो कोटी काढून घेतले

परदेशी गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटमधून माघार घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 3 आठवड्यात 10 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. त्यामुळे भारतीय शेअर मार्केट डगमगले आहे. परदेशी गुंतवणूक भारताबाहेर जाण्यामागील कारणे काय आहेत? जाणून घ्या.

Read More

Village of Fruits in Satara: साताऱ्यातील छोटंस खेडेगाव महाराष्ट्रात चमकलं; 'फळांच गाव' म्हणून धुमाळवाडीचा गौरव

जेमतेम बाराशे लोकसंख्या असलेल्या धुमाळवाडीनं फळशेतीचा आदर्श घालून दिला आहे. गावामध्ये 19 पेक्षा जास्त फळांची यशस्वी लागवड केली जाते. छोट्याशा गावाची उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त आहे. 'फळांचं गावं' कसं नावारुपाला आलं वाचा.

Read More

world pharmacy day 2023: भारतीय फार्मा उद्योगातले टॉप 5 विश्वासू स्टॉक्स

भारत आज जगभरातल्या जवळपास 200 पेक्षा जास्त देशांना औषधं पुरवतो आहे. फार्मा कंपन्यांच्या दमदार कामगिरीनं त्यांचे स्टॉक्सही तेजीत असलेले पाहायला मिळतात. आज भारतातले पाच सर्वोत्तम स्टॉक्स कोणते यावर एक नजर टाकणार आहोत.

Read More

Zerodha Investment: झिरोधाचे निखिल कामथ 'या' ज्वेलरी ब्रँडमध्ये करणार 100 कोटींची गुंतवणूक

भारतीयांना सोन्याच्या दागिन्यांचे आकर्षक काही नवे नाही. मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरांमध्येही ब्रँडेड ज्वेलरी शॉप सुरू होताना दिसत आहे. या क्षेत्रातील संधी पाहून निखिल कामथ यांनी एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. ज्वेलरी ब्रँड्सला निधी देण्यासाठी मोठे गुंतवणुकदार उत्सुक असल्याचंही दिसून येत आहे.

Read More

Elon Musk आता ‘X’ वर पेमेंट सुविधा देण्याच्या तयारीत, काय आहे योजना? जाणून घ्या

एलन मस्क हे येणाऱ्या काळात X वर पेमेंट सुविधा देखील आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने एक योजना आखली असून याबाबत सर्व शक्यता तपासून घेतल्या जात आहेत. लवकरच ही सुविधा ग्राहकांसाठी सुरु केली जाईल असा अंदाज आहे.

Read More

Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचे भरभरून दान; 4 दिवसांत कोट्यवधींचा निधी जमा

Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान केले जात आहे. मागील 4 दिवसांत राजाच्या चरणी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख स्वरूपात जवळपास 1 कोटी 59 लाख रुपयांचे दान जमा झाले आहे.

Read More