Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Basmati Rice Exports: बासमती तांदळाची निर्यात स्वस्त; किमान निर्यात दरात सरकारकडून कपात

बासमती तांदळाच्या स्थानिक बाजारपेठेतील किंमती कमी करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सरकारने किमान निर्यात दर 1200 डॉलर करण्याचा निर्णय घेतला होता. आता निर्यातीचे दर कमी केल्याने पुन्हा भारतीय तांदूळ जागतिक बाजारात स्पर्धात्मक दराने विकला जाईल.

Read More

Indian Mobile Congress: दिल्लीत मोबाईल क्षेत्राबद्दल होणार महाचर्चा, स्टार्ट अप उद्योगांसाठी सरकार आणणार योजना

दिल्लीत होऊ घातलेल्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हजेरी लावणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थित शास्त्रज्ञांना, कंपनीच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दूरसंचार विभाग (DoT) आणि सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) द्वारे संयुक्त विद्यमाने 3 दिवस वेगवगेळ्या विषयवार चर्चा केली जाणार आहे. या कार्यक्रमात 1 लाखाहून अधिक लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

Read More

Google Pay Loan: 'गुगल पे'मधून कर्ज मिळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Google Pay Loan: भारतातील छोट्या किरकोळ व्यापाऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात खूप अडचणी येतात. विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या मागणीमुळे कर्जदार बँकेकडून कर्ज घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. हीच अडचण लक्षात घेऊन गुगल पे ने किरकोळ व्यावसायिकांना 15,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.

Read More

Apple Sale: ॲपल आणणार एकापेक्षा एक धमाकेदार प्रोडक्ट्स, Scary Fast Event मध्ये होणार लॉन्चिंग

या इवेंटमध्ये जगभरातील ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन नवनवीन तंत्रज्ञान असलेले ॲपलची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंतची ॲपलची मार्केटिंग रणनीती लक्षात घेता Apple Scary Fast Event मध्ये अपडेटेड मॅकबुक प्रो आणि iMac चे लॉन्चिंग केले जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

1000 Rs. Notes: एक हजाराच्या नोटा परत चलनात येणार का? जाणून घ्या RBI चे स्पष्टीकरण

याबद्दल सविस्तर माहिती देताना आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी चलनी नोटा पुरेशा प्रमाणात आहेत. 2000 हजारांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्यानंतर पैशांचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढतील अशी चर्चा सुरु होती. आरबीआयच्या या घोषणेनंतर या समस्येचे देखील निराकरण झाले आहे.

Read More

Realme आणि OnePlus कंपनी भारतातून गुंडाळणार गाशा; टीव्ही उत्पादन आणि विक्री करणार बंद

SMART TV Market: मूळच्या चीनमधील असलेल्या आणि अल्पावधीत भारतात प्रसिद्ध झालेल्या OnePlus आणि Realme इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी इथून पुढे भारतात टीव्हीचे उत्पादन आणि विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

L&T Finance: आरबीआयकडून एल अँड टी फायनान्सला अडीच कोटींचा दंड; काय आहे कारण?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एल अँड टी फायनान्सला अडीच कोटींचा दंड ठोठावला आहे. नॉन बँकिंग फायनान्स कंपनीसाठीचे नियम न पाळल्यामुळे कंपनीला हा दंड करण्यात आला आहे. किरकोळ कर्जदारांसंबंधीची माहिती लपवल्याचेही पुढे आले आहे.

Read More

Kautilya Economic Conclave: व्याजदरात सवलत मिळण्याची शक्यता कमी - गव्हर्नर शक्तीकांत दास

Kautilya Economic Conclave: चलनविषयक धोरणामध्ये परिस्थितीनुसार बदल करावा लागतो. त्यामुळे ते नेहमीच आव्हानात्मक असते. फेब्रुवारीपासून रेपो दरामध्ये वाढ किंवा घट केलेली नाही. त्यामुळे वाढत असलेला महागाई दर आता हळुहळू कमी होऊ लागला असल्याचे, शक्तीकांत दास यांनी सांगितले.

Read More

Laptop Import: लॅपटॉप, टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल; सरकारकडून आयात धोरणात बदल

केंद्र सरकारने लॅपटॉप आणि टॅबलेट आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारने आयातीवर निर्बंध लागू केले होते. मात्र, टीका झाल्यानंतर आता धोरणात बदल केला आहे.

Read More

गुगलचा Pixel आता मेड इन इंडिया मिळणार, 2024 पासून Pixel 8 मॉडेलची होणार विक्री

Google Pixel: मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारत गुगलच्या पिक्सेलच्या 8 या मॉडेलची निर्मिती करणार आहे. 2024 पासून भारतीय बनावटीचे हे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Read More

Wheat Prices: सणासुदीच्या तोंडावर गहू महागला; किंमती 8 महिन्यांच्या उच्चांकावर

मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने किरकोळ बाजारही किंमती वाढल्या आहेत. आयात गव्हावर शुल्क जास्त असल्याने मिल मालकांना असा गहू परवडत नाही. त्यामुळे सरकारला काही दिवसांतून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामांतील गहू बाहेर काढावा लागू शकतो. अन्यथा अन्नधान्य पदार्थांची महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Trident Group IT Raids: ट्रायडंट ग्रूपवर इन्कम टॅक्स विभागाच्या देशभर धाडी; कंपनीचे शेअर्स कोसळले

ट्रायडंट ग्रूपच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. टेक्सटाइल, पेपर, स्टेशनरी, केमिकल, पावर अशा विविध क्षेत्रांमध्ये ट्रायडंट ग्रूपचा व्यवसाय विस्तार आहे. या कंपनीचे मालक पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत.

Read More