Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Union Budget 2023-Expectation from Auto Industry: भारतीय ऑटोमोटीव्ह क्षेत्राला आगामी बजेटपासून मोठी अपेक्षा

Auto Sector Expectations from Budget 2023: भारतीय अर्थव्यवस्थेत कोरोना संकटानंतर सुधारणा पाहायला मिळत आहे.भारतीय ऑटोमोटीव्ह/मोबीलीटी (Automotive and Mobility) यापासून वेगळी नाही. बजेटमधून सामान्य वर्गासाठी काही सकारात्मक बातमी येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. महागाई व इंधन दरवाढ यांचा ऑटोमोटीव्ह क्षेत्रावर परिणाम झाला आहे.

Read More

Maruti Suzuki Cars: शेणालाही येणार सोन्याचे दिवस! प्रदूषण रोखण्यासाठी मारुती सुझुकीचा नवा प्लॅन

प्रदूषण रोखण्यासाठी मारुती सुझुकी भविष्यामध्ये मोठं काम करणार आहे. त्यासाठी पायलट प्रोजक्टही सुरू करण्यात आला आहे. वाहनामधून होणारं कार्बन प्रदूषण कमी करण्यासाठी शाश्वत इंधन निर्मितीवर कंपनीकडून काम करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेण वापरण्यात येणार आहे.

Read More

Toyota CEO Resign's : EV कार निर्माता म्हणून टेस्लाचे वर्चस्व, हा धोका लक्षात घेऊन टोयोटा कंपनीच्या सीईओंचा राजीनामा

Toyota CEO Resigns : टोयोटा कंपनीचे माजी सीईओ टोयोडा ( Toyota Ex CEO Toyoda) यांनी राजीनामा दिला आहे.कंपनीचे भविष्यातील EV संदर्भातील धोरण टोयोडा यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी सीईओ पदाचा कार्यभार सोडला. कंपनीचे माजी ब्रँडींग अधिकारी किजो सातो (Kijo Sato) यांची सीईओ पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

Read More

Maruti Suzuki Car Booking: मारुती सुझुकीची गाडी बुक केलीयं? डिलिव्हरीला होऊ शकतो उशीर, कारण...

मागणीनुसार गाड्यांचा पुरवठा कमी होत असल्याने वेटिंग पिरियडही वाढत आहे. जिम्मी आणि फ्राँक्स या गाड्या नुकत्याच कंपनीने नोयडा येथील ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केल्या. या गाड्यांसाठी बुकिंग वाढली आहे. एकूण बुक केलेल्या गाड्यांचा आकडा चार लाखांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे जर तुम्ही मारुती सुझुकीची कार बुक केली असेल तर डिलिव्हरीला उशीर होऊ शकतो.

Read More

Hyundai Investment Plan: ह्युंदाय मोटरची 70000 कोटींची गुंतवणूक, इलेक्ट्रि्क कार्सची नवी मॉडेल्स आणणार

Hyundai Investment Plan: दक्षिण कोरियाची आघाडीची ऑटो कंपनी ह्युंदाय मोटरने 8.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ इंधनाचा अर्थात इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीवर कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे. याती काही गुंतवणूक भारतात होण्याची शक्यता आहे.

Read More

Shah Rukh Khan Cars Collection: जाणून घ्या, बाॅलिवुडचा बादशाह शाहरूख खान याच्याकडील लक्झरी कार्सचे कलेक्शन व किंमती

Shah Rukh Khan: बाॅलिवुडचा बादशाह शाहरूख खान हा सध्या पठाण (Pathan) चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहेत. त्याचे चाहते त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बुक करीत आहेत. मात्र शाहरूखवर प्रचंड प्रेम करणाऱ्या चाहत्यांना माहिती आहे का, शाहरूख खान जवळ किती कार्स असून त्याच्या किंमती काय आहेत?

Read More

Honda e-scooter: EV स्कुटर घेणार असाल तर थांबा! होंडा कंपनी लाँच करणार अॅक्टिवाचं इलेक्ट्रिक मॉडेल

भारतीय नागरिकांच्या गरजा पाहून इ स्कूटर बाजारात आणल्या जातील. होंडाच्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित असतील. अॅक्टिव्हा स्कूटीमध्ये सध्या जे पेट्रोल डिझेल कंम्बशन इंजिन वापरले जाते त्याचे रुपांतर इ स्कूटरमध्ये केले जाणार नाही. त्यासाठी वेगळे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Read More

EV Sale: इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत यंदा 2000% वाढ होणार, देशात तब्बल 18 लाख वाहनांची झालीय नोंद

देशात इलेक्ट्रिक व्हेइकलच्या विक्रीत मागील वर्षभरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. टाटा, महिंद्रांपासून लक्झरी कार्स उत्पादकांनी ईव्ही मॉडेल्सला प्राधान्य दिले आहे.

Read More

Jawa 42 Tawang: ईशान्य भारतासाठी खास Jawa 42 Tawang दुचाकी लाँच

Jawa 42 Tawang Edition च्या फक्त 100 गाड्या कंपनीने तयार केल्या आहेत. या गाडीची भारतीय बाजारातील किंमत 2 लाख 14 हजार रुपये आहे. Jawa 42 या गाडीपेक्षा युनिक लूक आणि फिचर्स या गाडीला दिला आहे.

Read More

Top Two-wheeler Brands: सर्वाधिक विक्री होणारे Top 5 टु-व्हिलर ब्रँड कोणते?

भारतीय ग्राहकांमध्ये कार घेण्याचे प्रमाण मागील काही वर्षात वाढले असले तरीही दुचाकीवरचे प्रेमही कमी झालेले नाही. दैनंदिन वापरासीठीच्या टुव्हीलर आणि प्रिमियम स्पोर्ट्स टुव्हीलर गाड्यांची विक्रीही भारतात वाढली आहे. या सेगमेंटमध्ये वाहन निर्मिती कंपन्या अनेक नवनवीन मॉडेल्स घेऊन येत आहे.

Read More

Ford Layoff: जागतिक आर्थिक मंदीचे सावट, फोर्ड हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत

Ford Layoff News: जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील आयटी कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. IT कंपन्यांपाठोपाठ आता वाहन क्षेत्रातही कर्मचारी कपात होण्याची शक्यता दिसू लागली आहे. फोर्ड (Ford) या जगप्रसिद्ध मोटार कंपनीने आपल्या 3200 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी केली असल्याचे समजते आहे.

Read More

Bureau of Energy Efficiency: प्रदूषणाबाबतचे नियम मोडल्यास ऑटो कंपन्यांना दंड, BEE ने बोलावली बैठक

प्रदूषण आणि इंधन बचतीबाबतच्या नियमांचे पालन न करणाऱ्या ऑटो कंपन्यांना कोटींमध्ये दंड भरावा लागणार आहे. त्यासाठी ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी(BEE) ने ऑटो क्षेत्रातील कंपन्यांची बैठक बोलावली आहे. नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास ऑटो क्षेत्रातील कंपन्यांकडून 6 हजार कोटींचा दंड वसूल केला जाऊ शकतो.

Read More