IMD Weather Forecast: 'एल-निनोचा प्रभाव असूनही मान्सून सर्वसाधारण'; कडक उन्हाळ्यानंतर अर्थव्यवस्थेला मिळणार गारवा?
4 जून रोजी मान्सून केरळात धडकणार आहे. यंदा एल निनोचा प्रभाव असला तरी मान्सून सर्वसाधारण असेल, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जोडलेले असते. अपुऱ्या पावसामुळे महागाई, वस्तूंची मागणीही रोडावू शकते. मात्र, हवामान विभागाने एल-निनोमुळे मोठे संकट उभे राहणार नाही, असा अंदाज वर्तवल्याने दिलासा मिळाला आहे.
Read More