Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Twitter Features: ट्विटरवरून पैसे कमवायचे आहेत? वाचा, काय म्हणाले एलन मस्क...

Twitter Features: ट्विटरवरून पैसे कमवायचे असतील तर आता नेमकं काय करावं लागेल, हे ट्विटरचे मालक असलेले अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांनी सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात पैसे कमवायचा पर्याय सांगितला आहे.

Read More

UPI Payment Record: डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक क्रमवारीत भारत अव्वल! केंद्र सरकारची माहिती

2022 या आर्थिक वर्षात भारतात 89.5 दशलक्ष डिजिटल व्यवहार नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणाऱ्या पहिल्या पाच देशांच्या यादीत भारताचा पहिला क्रमांक आहे.केंद्र सरकरच्या योजना आणि कामगिरीची माहिती देणाऱ्या MyGovIndia या पोर्टलने ही माहिती सार्वजनिक केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत होणारे हे बदल सकारात्मक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Read More

AI Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानं आता शेतीत क्रांती! शेतकऱ्यांना मिळणार भरघोस नफा

AI Farming: आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता शेतीमध्येही वापर होणार आहे. या माध्यमातून शेतीत क्रांती घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. कारण याद्वारे भरघोस नफाही शेतकऱ्याला मिळणार आहे. पण या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीत नेमका कसा होऊ शकतो? जाणून घेऊ...

Read More

Jobs in India: मंदीचा भारतालाही फटका, मे महिन्यात 7 टक्क्यांनी कमी झाली नोकरभरती

Jobs in India: जागतिक मंदीचा भारतालाही फटका बसला आहे. नव्या नोकरभरतीच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी नव्या नोकऱ्यांची निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यात भारतातल्या हायरिंग ट्रेंडबाबत मात्र ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read More

LIC buys shares in SAIL: एलआयसीने SAIL मधील भागीदारी 2 टक्क्यांनी वाढवून खरेदी केले 547 कोटींचे शेअर्स

LIC buys shares in SAIL: एलआयसीने स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (Steel Authority of India) आपली भागीदारी 2 टक्क्यांनी वाढवली आहे. ही गुंतवणूक ऑक्टोंबर 2022 पासून ते मार्च 2023 दरम्यान वाढविण्यात आली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही देशातील स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे.

Read More

Asia Cup and ICC World Cup: 'डिस्ने+ हॉटस्टार'वर आशिया कप, क्रिकेट वर्ल्डकप मोबाईलवर मोफत पाहता येणार

नुकताच संपलेल्या इंडियन प्रिमीयर लीगला मोफत दाखवून जिओ सिनेमाने नवा रेकॉर्ड केला होता. OTT प्लॅटफॉर्म्सवर क्रिकेट स्पर्धेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आगामी आशिया कप आणि क्रिकेट वर्ल्डकपची सिरिज मोफत प्रक्षेपण करण्याचा निर्णय 'डिस्ने+ हॉटस्टार'ने घेतला आहे.

Read More

Khadi India Record Sales: खादी उत्पादनांची मागणी वाढली, वर्षभरात तब्बल सव्वा लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल

Khadi India Record Sales: खादी आणि त्यासंबंधित उत्पादनाच्या मागणीत मागच्या वर्षभरात विक्रमी वाढ झाली. मिळालेल्या आकडेवारीनुसार तब्बल सव्वा लाख कोटींपेक्षा अधिक उलाढाल या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली आहे.

Read More

Edible Oil Price : खाद्य तेल 10 रुपयांनी स्वस्त, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्याचा परिणाम

Dhara Edible Oil Price : 'धारा' या खाद्यतेलाचा ब्रँड विकणाऱ्या मदर डेअरी एडिबल ऑइलने या तेलाच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. नवीन दरांसह पुढील आठवड्यापासून पॅकिंग उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे तेलाच्या किमतीत ही कपात करण्यात आली आहे.

Read More

BYJU's layoffs: 'बायजू'मध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

BYJU's layoffs: बायजूमधल्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. आतापर्यंत विविध टप्प्यात बायजूनं मोठी नोकरकपात केली होती. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांना कमी करण्याची मालिका कायम आहे. आताही मोठी नोकरकपात बायजू करणार आहे.

Read More

Double Decker seats in Flight: बस अन् ट्रेननंतर आता विमानातही डबल डेकर! बदलणार प्रवासाचा अनुभव

Double Decker seats in Flight : प्रवासी बस तसंच ट्रेनमध्ये डबल डेकर सीट आपण पाहिल्या आहेत. मात्र विमानात अशी सुविधा कधीही पाहण्यात आली नव्हती. आता ती सुविधाही विमानात दिली जाणार आहे. नुकतेच काही फोटो व्हायरल झाले आहेत. काय घडतंय यासंदर्भात नेमकं? पाहूया...

Read More

Aadhar For UPI Activation: आधार कार्डाने ॲक्टीवेट करा Google Pay, डेबिट कार्डची आता गरज नाही!

या सेवेअंतर्गत, Google Pay वापरकर्ते डेबिट कार्डशिवाय UPI पिन तयार करू शकतील. मात्र, गुगल पे युजर्सला त्यांचा मोबाईल फोन नंबर, बँक खात्याची माहिती आणि आधार कार्डाचा क्रमांक लिंक झाल्यावरच ते या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे ग्राहकांचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असायला हवा.

Read More

2000 Notes : दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी घाईगडबड करू नका! RBI गव्हर्नर काय म्हणाले, जाणून घ्या!

RBI गव्हर्नर म्हणाले की, रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे चलनाचा तुटवडा नाहीये. 2000 रुपयांच्या नोटा बदलवून देण्यासाठी आरबीआयकडे पुरेशा नोटा आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाहीये आणि पैसे बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ची वाट बघू नये असे देखील ते म्हणाले आहेत.

Read More