Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Digital Rupee: डिजिटल रुपीचे पेमेंट UPI द्वारे करता येणार; स्टेट बँकेकडून फिचर लाँच

स्टेट बँक ऑफ इंडियाने डिजिटल रुपी आणि UPI पेमेंट प्रणाली एकमेकांना जोडली आहे. त्यामुळे ई-रुपीच्या साह्याने कोणताही क्युआर कोड स्कॅन UPI पेमेंट करता येईल. डिजिटल रुपीचा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असून लवकरच सर्वांना डिजिटल चलन वापरता येईल.

Read More

Free Trade Agreement : भारताशी मुक्त व्यापार करार सध्या तरी शक्य नाही, ऋषी सुनक यांची माहिती

मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये व्यवसाय सुलभ होणार आहे. आयात आणि निर्यातीच्या किचकट अटी आणि तांत्रिक मुद्दे यामुळे निकालात लागणार आहे. तसेच दोन्ही देशांतील लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना देखील जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Read More

Paytm Promotor: पेटीएममधील चिनी कंपनीचे वर्चस्व संपुष्टात; विजय शेखर शर्मांकडे सर्वाधिक मालकी हक्क

पेटीएममधील चिनी कंपनीचा प्रभाव संपुष्टात आला आहे. कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांच्याकडे सर्वाधिक मालकी हक्क आले आहेत. अँटफिन शेअर होल्डिंग या चिनी कंपनीच्या ताब्यातील 10.3% हिस्सा शर्मा यांनी खरेदी केला आहे.

Read More

South Korea चा अजब निर्णय, घरकाम करण्यासाठी परदेशी कर्मचाऱ्यांना बोलावणार

दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सोल (seoul) या शहरापासून पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 परदेशी घरेलू कामगारांना निमंत्रित केले जाणार आहे. या कामगारांना दक्षिण कोरिया सरकारच्या नियमांच्या अधीन राहून काम करावे लागणार आहे.

Read More

Vistara आणि Air Indiaच्या विलीनीकरणाला मंजुरी, टाटा समुहाची नवी योजना लवकरच

Tata Sons आणि सिंगापूर एयरलाईन्स भागीदारीत विस्तारा एयरलाईन्स चालवतात. विस्तारा मध्ये सिंगापूर एयरलाईन्सचे एकूण 49% शेयर्स आहेत. त्यामुळे या विलनिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागला असे म्हटले जात आहे. तसेच CCI ने सिंगापूर एयरलाईन्सला एयर इंडियातील काही शेयर्स खरेदी करण्याची देखील अनुमती दिली आहे.

Read More

Meta Subscription : आता इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, मेटाचा महत्त्वाचा निर्णय

यापुढे फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना ही सेवा घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. काय म्हणता? विश्वास बसत नाहीये? मात्र ही बातमी अगदी खरी आहे. आधी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील खाते सत्यापित करण्यासाठी मेटाने पैसे आकारण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र युजर्सला देखील ही सेवा घेताना पैसे मोजावे लागणार आहेत.

Read More

2000 Notes : दोन हजाराच्या 93% नोटा बँकेत जमा झाल्या, नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख आलीये जवळ

दोन हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी आणि त्याचा भरणा करण्यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ दिला गेल्यामुळे बँकांना देखील नागरिकांना सहकार्य करणे सुलभ झाले आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीवेळी नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला होता, तो यावेळी सहन करावा लागलेला नाहीये.

Read More

G20 Summit मुळे देशातील छोट्या व्यापाऱ्यांना काय होणार फायदा? जाणून घ्या डीटेल्स

भारताने दिलेल्या प्रस्तावात एमएसएमई व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठ आणि वित्तीय व्यवस्थेची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांना जागतिक स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे म्हटले होते. यावर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो.

Read More

Rice Export : भारताचा तांदूळ सिंगापूरमध्ये होणार निर्यात, सिंगापूरला निर्यातीत सूट

सिंगापूरने भारताला तांदळावरील बंदीतून सूट दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सिंगापूर दुतावासाने भारत सरकारचे आभार मानले आहेत. भारत आणि सिंगापूर या दोन देशांचे मैत्रीसंबंध या निर्णयामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास सिंगापूरच्या दुतावासाने व्यक्त केला आहे.

Read More

ISRO Aditya L1 Mission: चांद्रयानाच्या यशानंतर आता सूर्यावर स्वारी! इस्त्रोचे आदित्य L1 अवकाशात झेपावले, बजेट जाणून घ्या

ISRO Solar Mission: आदित्य L1 मिशनमध्ये आज यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी एकमेकांचे अभिनंदन केले. सूर्य आणि सूर्याभोवती असलेल्या आवरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रोने आदित्य L1 मोहीम तयार केली आहे.

Read More

RBI Governor : अभिमानास्पद! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ठरले जगातील सर्वोत्कृष्ट बँकर

ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड मध्ये जागतिक स्तरावर 3 सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरला A+ रेटिंग देण्यात आले आहे. त्यामध्ये गव्हर्नरच्या यादीत शक्तिकांत दास यांना प्रथमस्थानी आहेत. A+ रेटिंग देण्यात आलेल्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरच्या या यादीत इतर दोन नावांमध्ये स्वित्झर्लंडचे गव्हर्नर थॉमस जे. जॉर्डन आणि व्हिएतनामचे गव्हर्नर गुयेन थी हाँग यांचा समावेश आहे.

Read More

Indian Railway च्या मदतीने Amazon देणार सुपर फास्ट डिलिव्हरी सुविधा

पार्सल वाहतुकीसाठी इंडियन रेल्वेशी असा सामंजस्य करार करणारी अमेझॉन ही पहिली ई-कॉमर्स वेबसाइट ठरली आहे. तसे पाहायला गेले तर इंडियन पोस्ट आणि इंडियन रेल्वे दरम्यान गेली अनेक वर्षे पार्सल ट्रान्सफरचा सामंजस्य करार सुरु आहे. भारतात विस्तीर्ण पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्याचा उपयोग ग्राहकांना त्यांच्या गरजेचे सामान लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी केला जाणार आहे.

Read More