Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Post Schemes for Womens: पोस्टाच्या कोणत्या योजनांमध्ये महिलांना गुंतवणूक करता येऊ शकते?

Post Schemes for Ladies: भारतातील महिलांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आणि योजना आहेत; ज्याद्वारे महिला दीर्घकालीन गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात. महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी आज आपण फक्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती घेणार आहोत.

Read More

Sovereign Gold Bond Scheme: ऑनलाईन खरेदी करायची आहे? या बॅंकांच्या वेबसाईटवर आहे सुविधा

सोने स्वस्तात खरेदी करायचे असल्यास, साॅवरेन गोल्ड बाॅण्ड योजनेद्वारे तुम्ही खरेदी करु शकणार आहात. साॅवरेन गोल्ड बाॅण्ड्सची विक्री 11 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ग्राहकांना 15 सप्टेंबरपर्यंत बाॅण्ड खरेदी करता येणार आहे. तुम्हाला जर हे बाॅण्ड कुठे खरेदी करायचे आहेत असा प्रश्न पडला असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Read More

PM Kisan Samman Nidhi मध्ये चुकीची माहिती देऊन पैसे लाटणाऱ्यांवर होणार कारवाई, सरकार पैसे परत घेणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना त्यांचे केवायसी अपडेट देणे गरजेचे असते. PAN कार्ड, आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. याद्वारे ज्यांनी प्राप्तीकर भरला आहे अशांची माहिती सरकारला मिळाली आहे. त्यामुळे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीयेत. त्यामुळे आता अपात्र शेतकऱ्यांकडून योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत.

Read More

SGB: या सरकारी योजनेद्वारे स्वस्तात खरेदी करा सोने, फक्त 5 दिवसांची आहे मुदत! पाहा डिटेल्स

SGB: तुम्ही सोनं स्वस्तात विकत घ्यायचा प्लॅन करताय? मग तुम्ही सॉवरेन गोल्ड बाॅण्ड म्हणजेच सार्वभौम सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, सॉवरेन गोल्ड बाॅण्डची दुसरी सिरीज सुरू झाली आहे. त्यामुळे गुंतवणुदारांना कमी दरात सोनं खरेदी करता येणार आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

PMMVY: दुसरी मुलगी झाल्यास मिळणार 6 हजार रुपये, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना देणार महिलांना आर्थिक आधार

Government Scheme: मुलीच्या जन्माचे गुणोत्तराचे प्रमाण वाढावे यासाठी शासन 2017 पासुन प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) राबवित आहे. एप्रिल 2023 पासुन या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता दुसरे अपत्य मुलगी झाल्यास तिच्या आईला 6 हजार रुपये देण्यात येणार आहे.

Read More

Post Office Special Scheme: पोस्टाच्या या योजनेत करा एफडी, रक्कम होईल दुप्पट! पाहा डिटेल्स

तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवायच्या तयारीत असल्यास, पोस्टाची योजना तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते. चला तर त्या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

EPFO E-Nomination: PF काढताना नाॅमिनेशन गरजेचे आहे का? काय आहे नियम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (Employee Provident Fund Organisation) पैसे गुंतवणे सुरक्षित मानले जाते. तसेच, EPFO चा कारभार केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालत असल्यामुळे, व्याजदरही जास्त मिळण्यास मदत होते. त्यामुळे EPF मध्ये गुंतवणूक वाढली आहे. पण, महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला जर PF मधून पैसे काढायचे असल्यास, त्यासाठी नाॅमिनेशन गरजेचे आहे का? याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Ayushman Golden Card साठी तुमची पात्रता तपासायची आहे? जाणून घ्या सविस्तर

Ayushman Bharat Card: या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत दिला जातो. तसेच एका कुटुंबासाठी एक ‘आयुष्मान गोल्डन कार्ड’ दिले जाते. या कार्डवर कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी केली जाते आणि त्यांच्या आरोग्यविषयक अपडेट्स देखील या कार्डवर बघता येतात. या कार्डच्या मदतीने सरकारी व निमसरकारी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

Read More

Compensation for crop Damage : 3 लाख शेतकऱ्यांसाठी 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित; तुम्हाला मिळाला का निधी?

2022 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे 15,57,971 हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले होते. यावर राज्यशासनाकडनू या अतिवृष्टीमुळे पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1500 कोटी रुपये देण्यासंदर्भात 13 जून 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता.

Read More

Vishwakarma Scheme : विश्वकर्मा योजनेचा 3 लाख कारागिरांना होणार लाभ; प्रशिक्षणासह कर्जही मिळणार

केंद्र सरकार सुरू करत असलेल्या या योजनेतून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. या योजनंतर्गत सुरुवातील या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 3 लाखापेक्षा जास्त कारागिरांना लाभ देण्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केल्या प्रमाणे विश्वकर्मा योजनेत जवळपास 13 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Read More

Honey bee farming : मधकेंद्र योजनेसाठी मिळते 50 % अनुदान; शेतकऱ्यांना रोजगाराची नवी संधी

मधमाशी पालन हा व्यवसाय दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, मत्स्यशेती या व्यवसायाप्रमाणेच एक चांगले आर्थिक उत्पादन मिळवून देणारा व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अथवा बेरोजगार युवकांसाठी मधमाशी पालन किंवा मधकेंद्र ही एक रोजगाराची चांगली संधी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत यासाठी 50% अनुदान दिले जाते.

Read More

Onion Procurement : नाफेड 2 लाख टन कांदा खरेदी करणार; पण काय आहेत खरेदीचे निकष?

कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावताना केंद्र सरकारने कांद्याचा बफरस्टॉक वाढवण्याचा निर्णय देखील घेतला होता. त्यानुसार केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून राज्यातील शेतकऱ्यांचा 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. यासाठी राज्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यात नाफेडकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील कांद्याची ही खरेदी प्रति क्विटल 2410 रुपये दराने केली जाणार आहे.

Read More