Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

PM Svanidhi Yojana: पीएम स्वानिधी योजनेचा होणार विस्तार, अधिकाधिक नागरिकांना मिळणार फायदा

छोट्या विक्रेत्यांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या पीएम स्वानिधी योजनेची व्याप्ती वाढवली जाऊ शकते. आतापर्यत या योजनेत अनेक विक्रेत्यांना कर्ज मिळाले आहे. आतापर्यतच्या या योजनेचा आढावा घेऊन अधिकाधिक लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी म्हणून सरकार विशेष प्रयत्न करणार आहे.

Read More

Interest Subsidy Scheme : शैक्षणिक कर्जावरील व्याज होऊ शकते माफ; सरकारच्या CSIS योजनेची माहिती घ्या जाणून

केंद्राच्या उच्च शिक्षण मंत्रालयाकडून 2009 पासून CSIS ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकामध्ये मोडतात. त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या व्याजातून सवलत (Interest Subsidy Scheme) मिळते. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या गरीब(EWC) असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काढलेल्या कर्जावरील व्याजातून सवलत मिळते.

Read More

NPS Balance Check: NPS खात्यातील बॅलन्स घरबसल्या चेक करा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

NPS Balance Check: राष्ट्रीय पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करुन, रिटायरमेंट वेळी चांगला रिटर्न मिळू शकतो. तसेच सरकारद्वारे ही योजना चालवण्यात येत असल्याने रिस्कही खूप कमी असते. त्यामुळे तुम्हाला ठरलेला व्याजदर सहज मिळू शकतो. पण, तुम्हाला जर नियमितरित्या तुमच्या बॅलन्सचा अपडेट हवा असल्यास, तुम्ही या काही स्टेप्स फाॅल करुन तुमचा बॅलन्स पाहू शकता.

Read More

PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे? तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागातील घरासाठी लाभार्थींना 1 लाख 30 हजार रुपये दिले जातात. तर, पठारी भागातील घरांसाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते.यासाठी केंद्र आणि राज्य सरकार 60:40 च्या प्रमाणात खर्च करतात. या योजनेसाठी लाभार्थ्याने https://pmaymis.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून अर्ज दाखल करायचा आहे.

Read More

Onion MahaBank : कांदा साठवणुकीसाठी राज्य सरकार उभारणार कांद्याची महाबँक; कांदा चाळींसाठी वाढीव निधीची तरतूद

कांद्याचे भाव स्थिर राहात नाहीत. मात्र शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसल्याने कांद्याची आवक वाढल्यानंतर कमी किंमतीत कांदा विकण्याशिवाय पर्याय उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षेतखाली सुकाणू समिती स्थापन केली आहे. त्या समितीच्या मार्गदर्शनानुसार राज्यात कांद्याची महाबँक (Onion Mahabank) ही संकल्पनाही राबवली जाणार आहे.

Read More

Onion Procurement : शेतकऱ्यांना दिलासा!! NAFED करणार प्रति क्विंटल 2410 रुपये दराने कांद्याची खरेदी

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने राज्यातील तब्बल 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाफेड मार्फत हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. राज्यातील विविध कांदा बाजारपेठामधून ही कांदा खरेदी केली जाणार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या वतीने कांदा खरेदी सुरू करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे.

Read More

Pension Account: सॅलरी खाते असताना स्वतंत्र पेन्शन खाते सुरू करावे का? जाणून घ्या डिटेल्स

तुमचे सॅलरी खाते पेन्शन खात्यात रुपांतरीत करता येते हे लक्षात असू द्या. स्वतंत्र पेन्शन खाते सुरु करण्याची गरज नाहीये आणि त्यासाठी धावपळ करण्याची देखील गरज नाहीये. परंतु तुम्हांला यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

PM Kisan Samman Nidhi योजनेत शेतकऱ्यांना मिळेल अधिक फायदा, वाढू शकतो हफ्ता

यंदाचा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या योजनांचा गोरगरीब शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर पीएम किसान सम्मान निधीमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

पोस्टाची ही योजना माहितीये का तुम्हाला? 5 लाखाच्या गुंतवणुकीवर 2.24 लाख रुपये व्याज ते ही 5 वर्षात

Post Office Investment Scheme: पोस्टाच्या या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर किमान गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. जाणून घ्या या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती.

Read More

World Senior Citizen’s Day: 'या' पाच सरकारी योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी, वाचा सविस्तर

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. प्रत्येक वर्षी 21 ऑगस्टला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन जगभरात साजरा केला जातो. समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि प्रत्येकाच्या जीवनात अनुभवाचा प्रकाश टाकणाऱ्या वृद्धांचा सन्मान करणे, हा या दिनाचा उद्देश आहे. चला तर मग सरकारने वृद्धांसाठी कोणत्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत, ते जाणून घेऊया.

Read More

National Pension Scheme साठी नवे अपडेटेड पोर्टल सुरु, गुंतवणूकदारांचे काम होणार सोपे!

ग्राहकांना NPS मध्ये खाते सुरु करायचे असल्यास, त्यांना आता एका क्लिकवर याबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. खाते कसे सुरु करावे, त्याचे फायदे काय आहेत, त्यात गुंतवणूक कशी करावी अशी सर्व माहिती पोर्टलवर साध्यासोप्या पद्धतीने मिळणार आहे.

Read More

Anandacha Shidha : गोर गरिबांचा गणेशोत्सव, दिवाळसण होणार गोड; 100 रुपयात सरकार देणार आनंदाचा शिधा

सरकारने आनंदाचा शिधा या उप्रकमातंर्गत यंदाच्या वर्षी गौरी-गणपती आणि दिवाळी सणासाठी 100 रुपयात सणासाठी शिधा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये रवा, हरभरा डाळ, साखर, खाद्यतेल असे प्रत्येकी एक किलो साहित्य दिले जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे गोर-गरीब कुटुंबाची सणासुदीच्या काळात मोठी बचत होणार आहे.

Read More