Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

Delta Corp Share: डेल्टा कॉर्पचे स्टॉक्स गडगडले, जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर 1650 कोटी रुपयांची घसरण

Delta Corp Share: डेल्टा कॉर्पचे शेअर गडगडले आहेत. ही घसरण जीएसटी कौन्सिलच्या निर्णयानंतर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शेअर बाजार उघडताच डेल्टा कॉर्पोरेशनच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. स्टॉक 25 टक्क्यांनी खाली आला. या कालावधीत कंपनीचे मार्केट कॅप 1650 कोटी रुपयांनी घसरलं आहे.

Read More

Online Gaming Stock: ऑनलाईन गेमिंग स्टॉक्स गडगडले, जीएसटी लागू झाल्याचा शेअरला फटका

Online Gaming Stock: जीएसटी कौन्सिलने ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले. ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये 5 ते 25% घसरण झाली.

Read More

GST on Multiplex Food: सिनेमाघरातील खाद्यान्नावरील GST मध्ये कपात, सामन्यांना होणार फायदा

सिनेमा हॉलमध्ये विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांवरील GST दर कमी करण्याची नागरिकांनी सरकारला अनेकदा विनंती केली होती. सामान्य हॉटेलच्या तुलनेत सिनेमाघरात मिळणारे खाद्यपदार्थ महाग दराने विकले जात होते. या खाद्यपदार्थांवर 18% जीएसटी आकारला जात होता. यावर आता सामन्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आलाय...

Read More

GST Council Meet: ऑनलाइन गेमिंगवर 28% GST; तर कर्करोगावरील औषध स्वस्त

ऑनलाइन गेमिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. तसेच यापुढे घोड्यांची शर्यत आणि कसिनोवर 28% GST आकारण्यात येईल. मल्टिप्लेक्समधील फूड आणि शीतपेयवरील कर 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला. तसेच कर्करोग आणि काही दुर्मिळ आजारावरील औषधांना GST च्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उपचार स्वस्त होणार आहेत.

Read More

ITR Filing : आयटीआर भरताना उत्पन्नाची योग्य माहिती द्या; नाही तर येऊ शकते तुरुंगवासाची वेळ

आयकर कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत कर दात्यांनी आयटीआर (ITR) फाईल करणे आवश्यक आहे. कर दात्याने चुकीची अथवा खोटी माहिती भरल्यास करदाता हा दंडात्मक कारवाई, कायदेशीर खटला अथवा तुरुंगवासाच्या शिक्षेसही पात्र ठरू शकतो. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील मुख्य आयकर आयुक्त मिताली मधुस्मिता यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Read More

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Income Tax Return: आयकर भरण्याची सध्या लगबग सुरू आहे. 31 जुलै 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. त्यात आता यासंबंधीचे आकडे समोर आले आहेत.

Read More

ITR Filing : झिरो रिटर्न फाईल करण्याचे हे आहेत 5 फायदे

जर तुमचे वार्षिक आर्थिक उत्पन्न नवीन कर प्रणाली नुसार 3 लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला ITR दाखल करणे अनिवार्य आहे. मात्र, जर तुमचे उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागू होत नाही. म्हणजे तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न हे झिरो रिटर्न (NIL Return) समजले जाते. अशावेळी तुम्ही NIL Return फाईल करू शकता. NIL ITR का फाईल करायचे फायदे काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊयात

Read More

ITR filing: 'आउटस्टँडिंग टॅक्स डिमांड' म्हणजे काय? रिटर्न फाइल केल्यानंतर अतिरिक्त कर मागणी आल्यास काय कराल?

आयकर विभागाच्या e-filing संकेतस्थळावर तुम्हाला आउटस्टँटिंग टॅक्स डिमांड पाहता येईल. जर तुम्हाला अशी अतिरिक्त कर भरण्याची मागणी आली तर तुम्ही ही मागणी मान्य करून कर भरणा करू शकता. तसेच ही मागणी पूर्णत: किंवा अशंत नाकारू शकता. नाहीतर या कर रकमेसोबत तुम्हाला त्यावर व्याज भरावे लागेल.

Read More

GST Counsil Meeting: जीएसटी कौन्सिलची आज बैठक, ऑनलाइन गेम्स, सिनेमा कर आदी मुद्द्यांवर होणार निर्णय!

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो, तसा प्रस्ताव आधीच GST परिषदेकडे देण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) यावर 28 टक्के GST लावण्याचे आधीच मान्य केले आहे. तसेच सिनेमागृहातील अन्नपदार्थ, औषधी यांच्यावरील GST बाबत देखील निर्णय होणार आहे.

Read More

Tax Collection Rise: कर उत्पन्न वाढले, अप्रत्यक्ष करातून सरकारला 4.75 लाख कोटींचा महसूल

Tax Collection Rise: अर्थव्यवस्था दरमहा विस्तारत असून वस्तू आणि सेवा करात देखील भरघोस वाढ होत आहे. केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात अप्रत्यक्ष करातून 4.75 लाख कोटींचा कर महसूल मिळाला. कर उत्पन्नात आतापर्यंत 16% वाढ झाली.

Read More

GST and ED: करदात्यांनो सावधान! ED ची नजर आता GST संकलनावर, माहिती लपवली तर होईल नुकसान

PMLA Act 2002 मध्ये केलेल्या बदलांनुसार, ED ला मिळालेली माहिती ते GST नेटवर्क सोबत शेयर करणार आहेत. जेणेकरून सदर प्रकरणातील उद्योगांनी आजवर नियमित कर भरला की नाही, त्यात काही फेरफार तर केले नाहीत, काही माहिती तर लपवली नाही, अशा सर्व गोष्टींची चौकशी केली जाणार आहे.

Read More

ITR Filing: कर बचतीचे हे 5 पर्याय GenZ जनरेशनला माहित असणे आवश्यक!

Income Tax Return: सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे म्हणजे फक्त नियमांचे पालन करणे होत नाही. तर यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव देखील होतो.

Read More