Tomato Price: जुन्नरमधल्या शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून कमावले तब्बल 2.8 कोटी रुपये!
ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर हे मिळून शेती करतात. बारा एकर शेतीत त्यांनी यावर्षी टोमॅटोचे पीक घेतले होते. गेल्या सहा-सात वर्षांपासून ते सातत्याने टोमॅटोचे पीक घेत आहेत. यावर्षी त्यांच्या शेतात टोमॅटोचे दमदार उत्पन्न निघाले असून त्यांनी आतापर्यंत 17,000 क्रेट विकले आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचे भाव वधारले असताना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला आहे.
Read More