Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Manappuram Finance ED raid: मणप्पुरम फायनान्सच्या कार्यालयावर ED ची रेड! ठेवीदारांकडून पैसे घेताना नियमांचे उल्लंघन

Manappuram Finance ED raid: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहे. RBI ची नियमावली डावलून मणप्पुरम फायनान्ससने 150 कोटींच्या ठेवी नागरिकांकडून गोळा केल्याचा आरोप आहे. केरळमधील चार कार्यालयांवर इडीने छापा मारला. KYC नियमांचे उल्लंघन करुन रोखीने व्यवहार केल्याचा आरोपही कंपनीवर आहे. कार्यालयांवरील छाप्याची माहिती पसरताच कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी कोसळले.

Read More

Online Fraud: ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये 39 टक्के भारतीय कुटुंबे झाली शिकार, सरकारी यंत्रणा सतर्क

देशात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या सरकारने यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अर्थविषयक संसदीय समितीने या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत...

Read More

Yes Bank FD Rates: 'एफडी'च्या व्याजदरात येस बँकेने केला बदल, जाणून घ्या नवे व्याजदर

Yes Bank FD Rates: येस बँकेने ठेवीदारांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD Rates) व्याजदरात बदल केले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिकांना 7 % पर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 % पर्यंत व्याजदर मिळणार आहेत. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे.

Read More

Cheque वर रक्कम भरल्यानंतर Only लिहिणे का गरजेचे आहे? जाणून घ्या नियम

Cheque Payment: चेकने कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्यावरील माहिती नीट भरणे आणि ती तपासणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल, की चेकवर अक्षरात रक्कम भरल्यानंतर त्यापुढे Only असे लिहिले जाते किंवा रक्कम लिहिल्यानंतर (/-) अशा दोन रेषा ओढल्या जातात. त्याचा अर्थ काय जाणून घेऊयात.

Read More

Kotak Mahindra Bank Charges: कोटक महिंद्रा बँकेचे विविध सेवांसाठीचे शुल्क जाणून घ्या

Kotak Mahindra Bank Charges: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने नुकताच डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क वाढवले आहेत. डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता वार्षिक 259 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क भरावे लागणार आहे. येत्या 22 मे 2023 पासून ही शुल्कवाढ लागू होईल, असे बँकेने म्हटले आहे.

Read More

TDS on Fixed Deposit: कोणत्या मुदत ठेवींवर टीडीएस लागू होतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती

TDS on FD: बॅंकेतील मुदत ठेवींवर जमा होणाऱ्या व्याजावर सरकार टीडीएस (Tax Deducted at Sources-TDS) स्वरूपात टॅक्स आकारते. पण त्याचवेळी सरकार पोस्टातील टाईम डिपॉझिट फिक्स डिपॉझिट (TDFD) आणि रिकरिंग डिपॉझिटवर टीडीएस लावत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या प्रकारच्या मुदत ठेवींवर टीडीएस लागू होतो आणि कोणत्या ठेवींवर लागू होत नाही.

Read More

KYC update : मोठ्या बँक खात्यांवर सरकारची नजर, केवायसी केलं नसेल तर सावधान

KYC update : बँकेतल्या मोठ्या खात्यांवर आता सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम केवायसी अपडेटचं असणार आहे. तुमच्याही खात्यात मोठ्या रकमा असतील तर त्वरीत केवायसी करण्याचा सल्ला सरकारनं दिलाय.

Read More

RBI Penalties on Co-Op Banks: चार सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई, नियम मोडल्याने ठोठावला लाखो रुपयांचा दंड

RBI Penalties on Co-Op Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने 4 बँकांवर कारवाई केली आहे. यात तामिळनाडू स्टेट अपेक्स को ऑपरेटिव्ह बँक, बॉम्बे मर्कंटाईल को ऑपरेटिव्ह बँक, जनता सहकारी बँक आणि बारण नागरिक सहकारी बँक या चा बँकांना एकूण 44 लाख रुपयांचा दंड रिझर्व्ह बँकेने ठोठावला आहे.

Read More

Bank Holiday in May 2023: मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी; नियोजनासाठी सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या!

Bank Holiday in May 2023: मे महिना सुरु व्हायला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी दिली आहे. या 12 दिवसात दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Read More

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल; जाणून घ्या नवीन व्याजदर

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. पी ॲण्ड एस बँक 400 आणि 601 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे.

Read More

प्रमोद गोयंका विरोधात CBI कडून गुन्हा दाखल; कोण आहेत 2018 पासून मिसिंग असणारे प्रमोद गोयंका

SBI बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेच्या तक्रारीनंतर CBI कडून ज्वेलर्स व्यापारी प्रमोद गोयंका यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 2018 साली व्यावसायासाठी परदेशी गेलेले प्रमोद गोयंका हे मिसिंग आहेत.

Read More

Type of Cyber Frauds: सायबर घोटाळ्याचे प्रकार किती? ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी हे कराच!

ऑनलाइन व्यवहार करताना सुरक्षितता महत्त्वाची असते. तुमची एक चुकही महागात पडू शकते. बँक खात्यातून, युपीआय, वेबसाइटवरून किंवा कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगली पाहिजे. ऑनलाइन घोटाळ्याचे किती प्रकार आहेत. अशा हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकता. तक्रार कोठे करायची? यासंबंधिची माहिती या लेखात वाचा.

Read More