आर्थिक वातावरण अस्थिर असेल तर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते. आणि त्या प्रमाणात दरही वाढतात.
सोन्याचे आंतरराष्ट्रीय व्यवहार डॉलरमध्ये होतात. त्यामुळे डॉलर घसरला की, सोन्याच्या किमती वाढतात
जगभरात महागाई वाढत असते तेव्हा ‘हेजिंग’साठी लोक सोन्यात गुंतवणूक करतात.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला तरी सोन्याची किंमत वाढते
कोव्हिडच्या काळात कमी झालेली दागिन्यांची देशांतर्गत मागणी वाढतेय. त्यामुळे भारतात सोन्याच्या किमती चढ्या आहेत.