Henley and Partners या संस्थेने श्रीमंत शहरांची यादी प्रकाशित केली आहे. जाणून घ्या भारतातील 5 शहरं जिथे सर्वाधिक कोट्याधीश व्यक्ती राहतात.
जगभरातील ज्या शहरांत सर्वाधिक करोडपती राहतात, त्या आधारावर ही यादी बनवली गेली आहे. श्रीमंत व्यक्तींची संपत्ती अमेरिकन डॉलरनुसार (USD) मोजण्यात आली.
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबईचा जगात 21 नंबर लागतो. मुंबईत 59,400 कोट्याधीश राहतात.
श्रीमंत शहरांच्या यादीत जगात दिल्लीचा 36 वा क्रमांक लागतो. या शहरात 30,200 करोडपती राहतात.
कर्नाटक राज्यातील बेंगळुरू शहराचा श्रीमंत शहरांच्या यादीत जगात 60 वा क्रमांक लागतो. या शहरांत 12,600 करोडपती राहतात.
पश्चिम बंगालची राजधानी असलेले कोलकाता हे शहर जागतिक पातळीवर श्रीमंत शहरांच्या यादीत 63 व्या क्रमांकावर आहे. या शहरात 12,100 करोडपती राहतात.
हैद्राबाद हे शहर जागतिक पातळीवर श्रीमंत शहरांच्या यादीत 65 व्या क्रमांकावर आहे. या शहरांत 11,100 करोडपती राहतात. अशीच जगभरातील श्रीमंत शहरांची यादी जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.