रतन टाटा आणि बिल गेट्स यांची भेट गेल्या आठवड्यातली ग्रेटभेट ठरली

दोन्ही उद्योगपती आपल्या दानधर्मासाठी प्रसिद्ध आहेत.

रतन टाटा यांनी आपल्या कमाईतला 50% हून जास्त हिस्सा दान केलाय. तर बिल गेट्स यांनी केलेल्या दानामुळे ते श्रीमंतांच्या यादीत खाली घसरले. पण, त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे G20 च्या निमित्ताने दोघांची मुंबईत भेट झाली तेव्हा चर्चेचा विषय चॅरिटेबल ट्रस्ट हाच होता.

गेट्स फाऊंडेशनने भारतात आरोग्य, रोग - निदान आणि सकस आहार या क्षेत्रात एकत्र काम करण्याची तयारी टाटा ट्रस्टकडे बोलून दाखवली.

या भेटीच्या वेळी टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन उपस्थित होते.

बिल गेट्स यांनी दोघांना ‘How To Prevent the Next Pandemic’ आणि ‘How To Avoid a Climate Disaster’ ही पुस्तकं भेट दिली

Click Here