उन्हाळा वाढतोय गाडीची काळजी घ्या

कार पॉलिश करून रंगाचे संरक्षण

उन्हाळ्यात वाहनांच्या रंगाला मोठा धोका असतो.हे टाळण्यासाठी,कारला अल्ट्राव्हायोलेट यूव्ही कोटिंगसह पॉलिश करा.यामुळे कारचा रंग खराब होणार नाही.

सनशेडचा वापर करा

कडक उष्णतेचा कार विंडशील्डवर परीणाम होतो. त्यामुळे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही सनशेडचा वापर करु शकता.सनशेड वापरल्याने कारमधील प्लास्टिकचे संरक्षण होईल आणि ते वितळण्यापासून किंवा फुटण्यापासून बचाव होईल.

टायर वेळोवेळी तपासा

उन्हाळ्यात गाडीच्या टायरमधील दाब वाढू लागतो.अशा परीस्थितीत टायर फुटण्याची शक्यता वाढते.हे टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी गाडीचे टायर्स तपासणे आवश्यक आहे.

कूलंटची विशेष काळजी घ्या

इंजिन थंड ठेवण्यासाठी कारमधील कूलंट महत्वपूर्ण काम करते.अशावेळी उन्हाळा सुरू झाला की सर्वप्रथम कूलंटची तपासणी करून घ्यावी

कारची काळजी घेताना 'या' चुका टाळा

बहुतांशवेळा जागा नसल्याने कार उन्हात पार्क करावी लागते.बराच वेळ उन्हात कार पार्क केल्याने गाडीचा रंग खराब होऊ शकतो.याशिवाय गाडी धुण्यासाठी उन्हात उभी ठेवू नका कारण गाडीचा रंग खराब होऊ शकतो.

Click Here