बिलेनिअर उद्योजक अनिल अगरवाल यांच्या वेदांता लिमिटेडने गुंतवणूकदारांना वर्ष 2022-2023 मध्ये 29.45% जबरदस्त डिव्हींडड दिला.वेदांताने जुलै 2001पासून 39 वेळा लाभांश दिला.
मेटल उद्योगातील हिंदुस्थान झिंकने सरत्या आर्थिक 25.76% डिव्हींडड दिला.वर्ष 2022-2023 मध्ये हिंदुस्थान झिंकने प्रती शेअर 75 रुपयांचा लाभांश जाहीर करत गुंतवणूकदारांना मालामाल केले.
कोल इंडिया ही डिव्हींडडच्या बाबतीत लोकप्रिय कंपनी आहे.कोल इंडियाने 2011पासून 23 वेळा लांभाश वाटप केले. मागील वर्षभरात कोल इंडियाने प्रती शेअर 23.25 रुपयांचा डिव्हीडंड जाहीर केला.
ONGC या सरकारी कंपनीने मागील 12 महिन्यासाठी 14 रुपयांचा डिव्हींडड दिला आहे.प्रती शेअर हे प्रमाण 9.24% इतके आहे.कंपनीने वर्ष 2000 पासून तब्बल 54 वेळा डिव्हीडंड दिलाय.
आरईसी लिमिटेड या कंपनीने वर्षभरात प्रती शेअर 11.30% डिव्हींडंड दिला आहे. गुंतवणूकदारांना प्रती शेअर 13.05 रुपये लाभांश मिळाला.