सिंगापूरचं छांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ यावर्षीचं सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलं.
कोव्हिड नंतर आता आंतरराष्ट्रीय सीमा उघडल्यात. आणि 80% विमान प्रवास पूर्ववत झाला आहे.
skytrax या संस्थेनं विमानतळाची देखभाल आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा यासाठी प्रवाशांची मतं मागवून हा सर्व्हे केला आहे
सिंगापूरच्या खालोखाल कतारचं हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतलं एकही विमानतळ पहिल्या दहातही नाही.
स्कायट्रॅक्स विमानतळ पुरस्कार मानाचे मानले जातात. 2023 सालची टॉपची 10 विमानतळं बघूया
सिंगापूर छांगी विमानतळ, दोहा हमाद विमानतळ, टोकयो हनेदा विमानतळ, सेऊल इंचियन विमानतळ, पॅरिस चार्ल्स दी गॉल विमानतळ.
इस्तांबूल विमानतळ, म्युनिच विमानतळ, झ्युरिक विमानतळ, टोकयो नारिटा विमानतळ, माद्रिद बाराहास विमानतळ.
Click Here