इथली MTR मास ट्रान्झिट रेल्वे जगात सर्वोत्तम मानली जाते. शहरात बस आणि मेट्रोचं चांगलं जाळं आहे. आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी ऑक्टोपस हे एकच कार्ड वापरता येतं.
स्वीत्झर्लंडमधलं सगळ्यात मोठं शहर झ्युरिचमध्ये ट्रामचं मोठं जाळं आहे. स्वीस ट्रॅव्हल पास असेल तर सार्वजनिक वाहतूक मोफत आहे
स्वीडनच्या या राजधानीत ट्राम, ट्रेन, सबवे, नदीवर चालणारी फेरी असं मोठं एकत्र नेटवर्क आहे. तुम्ही सिंगल तिकीट काढलंत की, 75 मिनिटांत तुम्ही या तिकिटावर कुठेही फिरू शकता.
आशियातलं मोठं औद्योगिक केंद्र असलेल्या सिंगापूरमध्ये बस आणि ट्रेनचं एकात्मिक जाळं पसरलेलं आहे.
ट्रेन, बस, फेरी, टॅक्सी, ट्राम यांच्या तगड्या नेटवर्कमुळे इथं लोक पर्यटनासाठीही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, असा शहराचा लौकीक आहे.