2 एप्रिल 2023 रोजी इंडियन आयडॉलच्या 13 व्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला, ज्यामध्ये एकूण 6 स्पर्धक पाहायला मिळाले
ऋषी सिंह, शिवम सिंह, बिदिप्ता चक्रवर्ती, देबोस्मिता रॉय,चिराग कोतवाल आणि सोनाक्षिकर या 6 स्पर्धकांनी इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले गाजवला
इंडियन आयडॉलच्या 13 व्या सिझनमध्ये नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांनी परीक्षक म्हणून, तर आदित्य नारायण याने सूत्रसंचालन केले
ऋषी सिंहने इंडियन आयडॉल सिझन 13 च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं. त्याला ट्रॉफी सोबत 25 लाखांचा चेक आणि मारुती सुझुकीची ‘ब्रीझा’ ही नवी कोरी कार मिळाली
सिझन 13 ची पहिली रनर अप 'देबोस्मिता रॉय' ठरली, तर दुसरा रनर अप 'चिराग कोतवाल' ठरला आहे. या दोघांनाही प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आले आहेत