तुमच्या कुंटुंबाची एकूण महिन्याची मिळकत आणि महिन्याभरात होणारा खर्च यांचा जमाखर्च म्हणजे बजेट. बजेट नियमितपणे आखा आणि ते पाळाही.
दिवसभरात तुमचा पैसा जास्त कुठे खर्च होतो याचा नियमित आढावा घ्या. आणि त्यातले अनावश्यक खर्च कमी करा . नवा पैसा खर्च करताना दोनदा विचार करा.
सरकारने आपल्याला पगारातून जाणारा कर वाचवण्यासाठी काही गुंतवणुकीचे मार्ग दिले आहेत. PPF, विविध विमा योजना असे मार्ग त्यासाठी उपलब्ध आहेत. गुंतवणूकही करा आणि त्यावर आयकरही वाचवा.
विमा कवच हे तुमच्या कुटुंबीयांसाठी भविष्याची तरतूद करतं. तेव्हा विमा पॉलिसी निवडताना चुकू नका. कुटुंबाला आवश्यक विमा रक्कम मिळेल अशी पॉलिसी निवडा.
एकच प्रकारे गुंतवणूक करू नका. आणि सगळे पैसे एकाच ठिकाणी ठेवू नका. बँका, मुदतठेवी, पोस्ट ऑफिस, म्युच्युअल फंड, विमा अशा सगळ्या गुंतवणूक साधनांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करा.