ट्रेनची टक्कर वाचवण्यासाठी कवच प्रणाली किती खर्चिक आहे?

गेल्या आठवड्यात ग्रीसमध्ये राजधानी अथेन्स जवळ दोन ट्रेनची जोरदार टक्कर झाली.

त्यामुळे वेगात असलेल्या एक्सप्रेस ट्रेनचे पहिले चार डबे रुळावरून घसरले आणि दोघांना आग लागली

या अपघातात आतापर्यंत 50 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे

एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडीच्या या टकरीमुळे पुन्हा एकदा कवच यंत्रणेची चर्चा सुरू झाली आहे

दोन ट्रेनची टक्कर होऊ नये यासाठी भारतीय रेल्वे कवच ही यंत्रणा वापरते.

यामुळे ट्रेन ज्या मार्गावर असेल तिच्या आसपास पाच किलोमीटर पर्यंतचा मार्गात दुसरी ट्रेन आली तर ट्रेनच ब्रेक आपोआप लागतात.

भारतात विकसित झालेली कवच यंत्रणा जगात सर्वात कमी किमतीची असल्याचा भारताचा दावा आहे.

एकदा यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर एका किलोमीटरसाठी 50 लाखांचा खर्च येतो. जगभरातल्या अशा यंत्रणांना सरासरी 2 कोटी रुपये इतका खर्च येतो

कवच यंत्रणा येत्या तीन वर्षांत निर्यात करण्याचा निर्धार भारतीय रेल्वेनं केला आहे

Click Here