अल्प बचत योजनांचे नवे व्याजदर 1 एप्रिल 2023 ते 30 जून 2023 या तिमाहीसाठी लागू होतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना तीन महिने जादा व्याज मिळणार आहे.
पोस्टात 1 वर्षाच्या ठेवीवर आता 6.8% इतके व्याज मिळेल. 2 वर्षांच्या ठेवींवर 6.9%, 3 वर्षांसाठी ठेवींवर 7% आणि 5 वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर 7.50% इतका वाढला.
पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेचा (MIS) व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.4% व्याज मिळणार आहे. यापूर्वी तो 7.1% होता.त्यात 0.30% करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांच्या व्याजदरात 0.20% वाढण्यात आला. जेष्ठांना आता बचतीमधून 8.20% व्याज मिळणार आहे. तिमाही स्तरावर हे व्याज मिळेल.
राष्ट्रीय बचत पत्रामधील (NSC VIII Issue) गुंतवणूक आणखी आकर्षक झाली. यातीन गुंतवणुकीचा व्याजदर 7.70% इतका वाढवला आहे. त्यात 0.70% वाढ झाली.
किसान विकास पत्रामधील (KVP) गुंतवणुकीवर 7.5% व्याज दिले जाईल .किसान विकास पत्राचा गुंतवणूक कालावधी 115 महिने करण्यात आला आहे. यापूर्वी तो 120 महिने होता.
मुलींच्या भविष्याकरिता केल्या जाणाऱ्या गुंतणुकीवर आता जादा व्याज मिळेल. आजपासून सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8% करण्यात आला आहे. यापूर्वी तो 7.6% इतका होता.
अल्प बचतीमधील महत्वाची गुंतवणूक योजना असलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (PPF) व्याजदर 7.1% कायम ठेवला आहे.