भारतात यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा एकदा ‘कोला - वॉर’ रंगणार आहे

मुकेश अंबानींच्या रिलायन्स समुहाने कॅम्पा - कोला 1970, 80 च्या दशकातला भारतीय कोला ब्रँड पुन्हा बाजारात आणायचं ठरवलंय.

यापूर्वी पेप्सी विरुद्ध कोकाकोला असं एक कोला - युद्ध जगाने पाहिलंय.

आता भारतात त्याची पुनरावृत्ती होणार आहे.

रिलायन्सची कोला - युद्धात लढाई आहे ती, अदानी ग्रुप, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ITC यांच्याशी

कॅम्पा-कोला, कॅम्पा-ऑरेंज आणि कॅम्पा-लेमन असे तीन फ्लेवर या महिन्याअखेरीस बाजारात येणार आहेत.

सुरुवात तेलंगाणा आणि आंध्रप्रदेशमधून होणार आहे

कॅम्पा-कोलाची पहिली जाहिरात सलमान खान आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी केली होती.

‘द रियल टेस्ट ऑफ इंडिया’ अशी या कोलाची कॅचलाईन लोकप्रिय होती

आता रिलायन्सने कोला मार्केटमध्ये उतरताना ‘स्वदेशी’ कॅचलाईन घेतली आहे.

Click Here