तुम्ही मुंबईपासून लांब राहता. पण, कामासाठी रोज मुंबईला येता?
कर्जत, कसारा, पनवेल, कल्याण-डोंबिवली, पालघर इथं राहणाऱ्या लोकांना अर्ध्या तासात मुंबईत घेऊन जाणाऱ्या रॅपिड मेट्रोचा अभ्यास सुरू आहे
त्यासाठी MMRDA च्या कार्यकारी संचालक अश्विनी भिडे यांनी सहकाऱ्यांसह नुकतीच नवी दिल्लीला भेट दिली
नवी दिल्लीत असा रॅपिड मेट्रो उपक्रम अस्तित्वात आहे. ही मेट्रो ताशी 180 किमी वेगाने धावते
नवी दिल्लीला उत्तर प्रदेशमधल्या मीरतशी जोडणारा हा रॅपिड मेट्रो कॉरिडॉर जून 2025 पर्यंत पूर्णपणे सुरू होणार आहे. सध्या या मार्गावर 17 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे
अशा उपक्रमांना ‘रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम’ (RPTS) असं म्हणतात. दिल्ली ते मीरत 82 किमीच्या मार्गाचा खर्च 30,274 कोटी रु होता
Click Here