पर्यटन तसंच जाहिरात - PR क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्या
Foundit कंपनीने जानेवारी 2023 मध्ये नोकर भरतीचा ट्रेंड काय होता याचा सर्व्हे केला
यात पर्यटन आणि PR कंपन्यांनी 15% नोकर भरती केली आहे
कोव्हिड नंतर या उद्योगांना पुन्हा उभारी आली आहे. त्यामुळे सर्वाधिक नोकर भरती या कंपन्यांनी केली.
त्या खालोखाल विमान कंपन्यांनीही केबिन क्रू भरती केली
पर्यटन क्षेत्रातल्या नोकऱ्या ट्रॅव्हल कन्सल्टंट तसंच डेस्क सांभाळणाऱ्या लोकांच्या होत्या. तर पीआर आणि जाहिरात क्षेत्रात डिजिटल मार्केटिंगमध्ये मोठी भरती झाली.
विशेष म्हणजे कोची, चंदिगड आणि चेन्नई या शहरांमध्ये सर्वाधिक आणि मुंबईपेक्षा जास्त नोकर भरती झाली.