केरळमधल्या कोची येथे पहिल्या वॉटर मेट्रोचे पोर्ट उभारले असून यासाठी 1 हजार 136 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्प केरळ राज्य सरकार व जर्मन येथील केएफडब्ल्यु या बँकेच्या साहय्याने पूर्ण करण्यात येत आहे.
कोची वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आसपासची 10 बंदरे जोडली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात हायकोर्ट ते वायपिंन टर्मिनल व विट्टीला ते कक्कनड टर्मिनल अशा दोन मार्गावर वाहतुक सुरू करण्यात येणार आहे.
या वॉटर मेट्रोसाठी हायब्रीड बोटिंचा वापर केला जाणार आहे. या विशेष बोटिंना गुस्सी इलेक्ट्रिन बोट या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.
या वॉटर मेट्रोसाठी साप्ताहिक पास 180 रूपये, एक महिना पास 600 रूपये तीन महिन्याच्या पाससाठी 1500 रूपये दर आकारण्यात येणार आहे.
तसेच ज्या प्रवाशांकडे कोची मेट्रोचा पास आहे त्या प्रवाशांना त्या कार्डवर वॉटर मेट्रोतून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा.