बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे.

शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी श्रद्धा बॉलिवूडमधल्या सगळ्यात जास्त पगार घेणाऱ्या स्टार्सपैकी एक आहे

मोठ्या घरातून आलेली असतानाही तिचं कॉलेज जीवन अगदी साधं होतं

बोस्टनमध्ये शिकत असताना तर तिने पॉकेट-मनीसाठी कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम केलंय

2010 मध्ये ‘तीन पत्ती’ सिनेमातून तिने बॉलिवूड पदार्पण केलं. पण, तिला खरं यश मिळालं 2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 ने

मीडिया रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 57 कोटी रु इतकी आहे. तिचा जुहूमध्ये सीफेसिंग बंगला आहे

एका सिनेमासाठी ती 5 कोटी इतकं मानधन घेते

श्रद्धाने लॅक्मे, फ्लिपकार्ट, सिक्रेट टेम्प्टेशन आणि व्हीटसाठी जाहिरातीही केल्यात. तिथेही तिची ब्रँड व्हॅल्यू खूप आहे

Click Here