रियल इस्टेट कंपनी DLF सर्वप्रथम 2008 साली 40 कोटी रुपयांमध्ये IPLचे हक्क खरेदी केले होते. 2012 साली हा करार संपला.
पेप्सीने तीन वर्षांसाठी IPL टायटल स्पॉन्सरशिप 396 कोटी रुपयांना खरेदी केली होती. स्पर्धेवरील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे कंपनीने हा करार मोडला.
मोबाईल कंपनी Vivo ने 2018 साली सर्वाधिक 2,199 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत 5 वर्षांसाठी ही स्पॉन्सरशिप खरेदी केली होती. यावेळी गलवान येथील भारत-चीन संघर्षामुळे या चायनीज कंपनीला या करारातून बाहेर पडावे लागले.
Vivo कंपनीसोबतचा हा करार मोडल्यानंतर Dream11 या गेमिंग प्लॅटफॉर्मने एक वर्षासाठी 222 कोटी रुपायांमध्ये IPL चे टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.
2021 साली Vivo कंपनीने आयपीएलची टायटल स्पॉन्सरशीप पुन्हा एकदा मिळवली. कारण या कालावधीत चीन-भारत तणाव कमी झाला होता मात्र तरीही विरोध झाल्यामुळे कंपनी करारातून बाहेर पडली.
दोन वर्षांसाठी टाटा कंपनीने 670 कोटी रुपयांना टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क विकत घेतले आहेत.