परकीय चलनाने सरकारची तिजोरी भरली!

देशाच्या परकीय चलन साठ्यात 6 बिलियन डॉलर्सची वाढ

भारताचा परकीय चलनसाठा 5.977 बिलियन डॉलर्सने वाढून 578.78 बिलियन डॉलर्स झाला.सोन्याचा साठा 45.48 बिलियन डॉलर्सवर पोहोचला.

RBI ने जाहीर केली परकीय चलन साठ्याची आकडेवारी

परकीय चलन साठा आणि गोल्ड रिझर्व्हबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच एक अहवाल जाहीर केला.

रुपयाच्या अवमूल्यनाचा बसला आर्थिक फटका

जागतिक घडामोडींमुळे रुपयात तीव्र अवमूल्यन झाले होते. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राखीव निधीचा वापर करण्यात आल्याचे RBI ने म्हटले आहे.

सोन्याचा साठा 45.48 बिलियन डॉलर्सवर गेला

सरकारकडील सोन्याचा साठा 31 मार्च 2023 अखेर 45.48 बिलियन डॉलर्स इतका वाढला असल्याचे RBI ने सांगितले.

'IMF'कडे भारताचा राखीव निधी

IMF कडील भारताचे स्पेशल ड्रॉइंग राइट्स(SDR) आणि राखीव निधीत वाढ झाली असून तो अनुक्रमे 18.41 मिलियन डॉलर्स आणि 5.15 मिलियन डॉलर्स इतका वाढला.

Click Here