अदानी - हिंडेनबर्ग प्रकरणातून गुंतवणुकदारांनी घ्यायचे पाच धडे
हिंडेनबर्ग अहवालानंतर एकट्या अदानी समुहाचं 78 अब्ज अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं
तर सामान्य गुंतवणुकदारांची संपत्तीही सरासरी 28% नी कमी झाली. नुकसान म्हणाल तर 9 लाख कोटी रु इतकं झालं
‘अल्पावधीत वर जाणारी गोष्ट खाली येतेच’ हा नियम विसरू नका. शेअर खरेदी करताना PE गुणोत्तर तपासून पाहा. ते कुठल्याही साईटवर कळू शकतं.
कंपनीवर किती कर्ज आहे हे तपासून पाहा. त्यासाठी डेब्ट रेशो तपासा. भरमसाठ कर्ज असलेले शेअर टाळा
संपत्ती फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात असावी लागते. शेअर कोसळल्यावर अदानी 37 व्या क्रमांकावर फेकले गेले.
म्हणजेच त्यांची संपत्ती शेअरमध्ये होती. ही खूप मोठी जोखीम आहे. कंपनीचे असेट्स तपासून बघा
आताही शेअर स्वस्तात मिळतोय म्हणून विकत घेऊ नका. कंपनीचा मूलभूत ताळेबंद अभ्यासूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्या
Click Here