इंडियाटुडेच्या एका रिपोर्टनुसार, शाहरुख एका सिनेमासाठी 35-40 कोटी रुपये घेतो. त्याच किंग खानला दिल्लीतल्या नाटक कंपनीत एका शोचे मिळत होते रु. 50 फक्त!
आज अक्की कुमार सलमानच्या खालोखाल सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. बँकॉकमध्ये हॉटेलमध्ये वेटर असताना त्याला मिळायचे महिन्याला रु. 1,500!
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीरचा पहिला सिनेमा होता ‘कयामत से कयामत तक’ घरच्या सिनेमासाठी त्याला मिळाले होते रु. 1,000
ह्रतिक बालकलाकार म्हणून काम करत होता तेव्हा त्याचं मानधन होतं रु. 100 ‘या पैशातून खेळणी विकत घ्यायचो,’ असं त्यानेच एका मुलाखतीत सांगितलं होतं.
माजी मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राचं बॉलिवूड पदार्पण झालं 2003 मध्ये. पण, तिच्या पहिल्या मॉडेलिंग असाईनमेंटसाठी तिला मिळाले होते रु. 5,000!
बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी बिग बि कोलकात्याला शिपिंग कंपनीत नोकरी करत होते. तिथे त्यांचा पगार होता रु. 500