2022 मध्ये देशातल्या उद्योगपतींनी किती रुपयांचा दानधर्म केला

या यादीनुसार पहिले पाच अब्जाधीश उद्योगपती आहेत शिव नादर, अझिम प्रेमजी, मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला आणि सुब्रतो बागची.

HCL टेक्नोलॉजीज चे शिव नादर हे कायम या यादीत पहिलं असणारं नाव आहे. 2022 मध्ये त्यांनी 1,161 कोटी रुपय दान केले

विप्रोचे संस्थापक अझिम प्रेमजी यांनी गेल्यावर्षी 484 कोटी रुपयांचा दानधर्म केला

तिसऱ्या स्थानावर आहेत रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी. त्यांनी 411 कोटी रुपये दान केले

तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या कुमारमंगलम बिर्ला आणि कुटुंबीयांनी 242 कोटी रुपये दान केले आहेत.

पाचव्या क्रमांकावर आहे माईंट्री या टेक कंपनीचे सुब्रतो आणि सुश्मिता बागची हे दाम्पत्य. त्यांनी 2022 मध्ये 212 कोटी रुपयांचा दानधर्म केला

Click Here