हिरा सगळ्यात मौल्यवान दागिना आणि खडा मानला जातो. हिऱ्याचे पाच महागडे नेकलेस आणि त्यांच्या किमती पाहूया...

'अ हेरिटेज इन ब्लूम’ (200 दशलक्ष अमेरिकन डॉलर)

रुपयांमध्ये नेकलेसचं मूल्य 16 अब्जांच्याही वर जातं. चायनीज हिरे कारागीर वॅलेस चॅन यांनी हाँग काँगमधल्या एका रिटेल व्यापाऱ्याच्या सांगण्यावरून तो बनवला होता.

‘द इनकम्पॅरेबल’ (55 दशलक्ष अमेरिकन डॉलर)

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी सून श्लोका मेहताला दिलेला हा नेकलेस 451 कोटी रुपयांचा आहे. मधल्या पिवळ्या रंगाच्या हिऱ्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ‘सर्वात मौल्यवान हिरा’ म्हणून झाली आहे.

‘द हार्ट ऑफ द ओशन’ (20 दशलक्ष अमेरिकन डॉलर)

प्रसिद्ध हॉलिवूडपट ‘टायटॅनिक’मध्ये हा नेकलेस केट विन्सलेट यांनी घातला होता. अ‍ॅस्प्रे अँड गेराड कंपनीने तो बनवला आहे.

‘द हार्ट ऑफ द किंग्डम’ (14 दशलक्ष अमेरिकन डॉलर)

मध्यभागी गुलाबी माणिक रत्न असलेला हा हिरा गेराड कंपनीनेच बनवला. पण, त्याची मालकी अज्ञात आहे.

‘येलो डायमंड पेन्डन्ट’ (10 दशलक्ष अमेरिकन डॉलर)

इस्त्रायलच्या लेव लिव्हिव या कंपनीने हा नेकलेस बनवला. मधला पिवळा खडा 77 कॅरेटचा आहे. टिफनी अँड कंपनीने तो विकत घेतला.

Click Here