केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% नी वाढला. निवृत्तीवेतन धारकांचाही होणार फायदा

गेल्यावर्षी जून महिन्यात महागाई भत्ता 38% होता. तो आता वाढून 42% झाला आहे.

47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख निवृत्तीवेतन धारकांना ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल.

त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल याचं एक उदाहरण बघूया.

महागाई भत्ता कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर लागू होतो.

23,500 रु मूळ वेतन असल्यास पूर्वीचा महागाई भत्ता (38%ने) - रु.8,930 सुधारित महागाई भत्ता (42% ने) - रु.9,870

त्यामुळे कर्मचाऱ्याच्या वेतनात रु.940 ची वाढ होईल.

निवृत्तीवेतन धारकांना मिळणाऱ्या वेतनातही याच प्रमाणात वाढ होईल.

Click Here