क्रेडिट स्वीस तरणार! हजारो नोकऱ्या जाणार

UBS कडून क्रेडिट स्वीस विलीनीकरणाला सुरुवात

स्वित्झर्लंड सरकारच्या निर्देशानंतर यूबीएसने क्रेडिट स्वीसचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला होता.आता विलीनीकरणाची प्रोसेस सुरु करण्यात आली.UBS बँक क्रेडिट स्वीसला 3.25 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी करणार आहे.

क्रेडिट स्वीस यापूर्वी अनेक घोटाळ्यांनी बदनाम झालीय

क्रेडिट स्वीस आर्थिक डबघाईला येण्यापूर्वी अनेक घोटाळ्यांनी बदनाम झालेली आहे.मागील दशभरात क्रेडिट स्वीसमध्ये अनेक छोटे मोठे आर्थिक घोटाळे,स्कॅंडल्स घडली.यातून बँकेला मोठा आर्थिक फटका बसला.क्रेडिट स्वीसची प्रतिमा मलीन झाली.

क्रेडिट स्वीस, UBS मध्ये सध्या 1 लाख 20 हजार कर्मचारी

क्रेडिट स्वीस आणि UBS या दोन्ही बँकांचा जगभर विस्तार,मिडिया रिपोर्टनुसार क्रेडिट स्वीसकडे 72000 हून अधिक कर्मचारी आहेत.UBS चे जगभरात 50000 हजारांहून अधिक कर्मचारी आहेत.

दोन्ही बँकामधून 20 ते 30% नोकर कपात होणार

विलीनीकरणानंतर खर्च कपात आणि काटकसरीच्या दृष्टीने मनुष्यबळात किमान 20% ते 30% कर्मचारी कपात होईल.दोन्ही बँकांचे मिळून जास्तीत जास्त 36000 कर्मचारी बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्वित्झर्लंडमधील 11000 कर्मचाऱ्यांना बसणार फटका

या मेगा मर्जरवर यूबीएसचे अध्यक्ष कोल्म केल्हेर म्हणाले की,दोन्ही बँकांचे एकत्रीकरण ही मोठी जोखीम आहे. या प्रोसेसमध्ये स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

Click Here