तुमची कर्ज मिळवण्यासाठीची पत म्हणजे सिबिल स्कोअर. तो कसा वाढवायचा ते इथं पाहूया
तुम्ही कर्जाची परतफेड करू शकता का याची संख्यात्मक आकडेवारी म्हणजे सिबिल स्कोअर. 300 ते 850 दरम्यान हा स्कोअर असावा.
750 च्या वर सिबिल स्कोअर चांगला समजला जातो
300 च्या खाली सिबिल स्कोअर वाईट असतो.
कर्ज मिळणं सोपं जातं, कमी व्याजदरही मिळू शकतो
क्रेडिट कार्ड बिल, हप्ते वेळेवर भरा
क्रेडिट कार्डात उपलब्ध पैशातला जास्तीत जास्त 30% हिस्सा वापरा. त्यापेक्षा मोठं बिल करु नका
एकावेळी जास्त कर्ज किंवा एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड बाळगू नका
कर्जांच्या स्त्रोतांमध्ये विविधता ठेवा. जसं की, क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्जं, गृहकर्ज
चांगला क्रेडिट स्कोअर असलेली जुनी खाती बंद करू नका