कर्नाटकातील राजकारणात अमूल विरूद्ध नंदिनी दूध कंपनीचा वाद ऐरणीवर

तमिळनाडूमधील दह्याच्या वादानंतर आता कर्नाटकमध्ये नंदिनी दूध आणि अमूल दूध हे ब्रॅण्ड समोरासमोर आले आहेत

राज्यातील आगामी निवडणूका लक्षात घेऊन राजकारण्यांकडून दूधवरून प्रादेशिक अस्मितेला हात

भारतातील दूधाचा सर्वांत मोठा ब्रॅण्ड अमूलची कर्नाटकमध्ये इंट्री करण्याची घोषणा

अमूलच्या घोषणेनंतर सोशल मीडियामध्ये #GoBackAmul #Savenandini हॅशटॅग वार सुरू

कर्नाटक सहकारी दूध उत्पादक संघ (KMF), अमूलनंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा दूध उत्पादक संघ

1974 मध्ये स्थापन झालेल्या कर्नाटक संघातर्फे वितरित होणारे नंदिनी दूध देशातील सर्वांत स्वस्त दुध

नंदिनी दुधाच्या 1 लीटर टोण्ड दुधाचा भाव बंगळुरुमध्ये 39 रुपये तर अमूल टोण्ड दुधाचा भाव गुजरातमध्ये 52 आणि दिल्लीत 54 रुपये

नंदिनी कंपनीचे म्हशीचे 900 मिलीलीटर दूध 50 रुपयांना, तर अमूलचे म्हशीचे 1 लीटर दूध 66 रुपये

नंदिनीचे 1 लीटर दही 47 रुपये तर, अमूलचे 1 लीटर दही 67 रुपये

नंदिनी कर्नाटकमधील सर्वांत मोठा ब्रॅण्ड. दररोज 23 लाख लीटर दुधाचा पुरवठा

नंदिनीला कर्नाटक सरकारकडून वार्षिक 1,200 कोटींची आर्थिक रसद

राज्यात नंदिनीचे 16 दूध उत्पादक संघ असून ते राज्यातील सर्व जिल्ह्यातून दूध संकलन करतात

Click Here