UPI Payment Limit of Major Banks: दैनंदिन जीवनात आपण UPI चा वापर जरी करीत असलो, तरी बऱ्याच लोकांना UPI म्हणजे नक्की काय हे माहिती नसते. तसेच आपल्या बॅंकेची UPI पेमेंटची लिमिट किती आहे, हे देखील शक्यतो लोकांना माहिती नसते. त्यामुळेच आज आपण UPI म्हणजे काय व काही बॅंकेच्या UPI पेमेंटची लिमिट पाहणार आहोत.
UPI म्हणजे काय?
युपीआयचा (UPI) फुलफाॅर्म हा युनिफायइड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface)असा आहे. युपीआयच्या माध्यमातून तुम्ही आॅनलाइन पध्दतीने पैशांचा व्यवहार करू शकता.यामध्ये तुमचे एकाच अॅपच्या माध्यमातून अनेक बॅंक अकाउंटचे व्यवहार सहज करू शकता. जसे की, ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असेल, तर त्या व्यक्तीचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला सहजरीत्या आॅनलाइन पैसे पाठवू शकता.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नुसार हा सर्व व्यवहार चालू असतो. विशेष म्हणजे NPCI नुसार कोणता ही व्यक्ती युपीआयच्या माध्यमातून एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रूपयांचा आर्थिक व्यवहार हा आॅनलाइन पध्दतीने करू शकतो. पण युपीआयव्दारे पैसे पाठविण्याची लिमिट ही प्रत्येक बॅंकेची वेगवेगळी आहे.
गुगल पे (Google Pay) ने जारी केलेल्या बॅंकांची UPI लिमिट

एचडीएफसी (HDFC) या बॅंकेने युपीआय (UPI) ट्रांझेक्शनची लिमिट ही 1 लाख रूपये निश्चित केली आहे. तर नवीन ग्राहकांसाठी ही लिमिट रक्कम 5 हजार रूपये करण्यात आली आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेची युपीआय (UPI) ट्रांझेक्शनची लिमिट ही 1 लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे.
आयसीआयसीआय (ICICI) या बॅंकेची युपीआय (UPI) ट्रांझेक्शनची लिमिट ही 10,000 रूपये आहे, तर गुगल पे (Google Pay) युझर्ससाठी ही लिमिट 25,000 रूपये इतकी आहे.
अॅक्सिस बॅंकेची युपीआय (UPI) ट्रांझेक्शन लिमिट ही 1 लाख रूपये इतकी निश्चित करण्यात आलीआहे.
बॅंक ऑफ बडोदा या बॅंकेचे ग्राहक युपीआय (UPI)ट्रांझेक्शनने साधारण एका दिवसात 25000 रूपयांचा व्यवहार करू शकतात.