• 31 Mar, 2023 08:36

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Employee layoffs: कर्मचारी कपातीचा आयटी इंडस्ट्रीवर काय परिणाम होत आहे?

Impact of Employee Layoffs

Employee layoffs: मागील काळी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुगल, फेसबुक, अॅमेझॉन सारख्या मोठ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात झाले आहेत. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले गेले आहे. या कपातीचा कर्मचारी, फ्रेशर्स, कंपन्या आणि एकूण आयटी क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, हे आपण समजून घेऊयात.

Impact of Employee Layoffs: गेल्या काही काळात टेक कंपन्या खूप चर्चेत आहेत. गुगल, अॅमेझॉन, मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या टेक कंपन्यांनी अलीकडेच हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये, या बिग टेक कंपन्यांनी जागतिक स्तरावर 70 हजारहून अधिक लोकांना कामावरून काढले आहे. बजेटच्या अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. पण तंत्रज्ञान कामगारांच्या या मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीचे कारण काय आहे आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार आहे?

इंडि 24 च्या आयटी इंडस्ट्री रिपोर्टनुसार, आयटी क्षेत्र आगामी काळात अनेक लोकांची भरती करेल. भारतीय आयटी क्षेत्रातील कॅपजेमिनी आणि इन्फोसिस मोठ्या प्रमाणात भरती करण्याची मोठी शक्यता आहे. अॅनालिटिक्स इनसाइटच्या अहवालात असे म्हटले आहे की, कॅपजेमिनी भारतातील तांत्रिक पदांसाठी उमेदवारांच्या शोधात आहे आणि देशभरात उपलब्ध पदांसाठी अर्ज स्वीकारत आहे. त्‍याच्‍या भरतीमध्‍ये फ्रेशर्स आणि लॅटरल हायरिंगचा समावेश होतो.

एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत इन्फोसिस कर्मचार्‍यांचे परिवर्तनीय वेतन 70 टक्क्यांनी कमी केले होते. या कमी टक्केवारीबाबत कंपनीने सांगितले की, भारतीय आयटी क्षेत्र मंदीतून जात आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि अॅमेझॉनचे अँडी जस्सी यांनी सांगितले होते की, पुढील वर्षापर्यंत कर्मचारी कपात होणार आहे. या सर्वांमध्ये, भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs: Indian Institutes of Technology) आणि भारतीय व्यवस्थापन संस्थांचे (IIMs: Indian Institutes of Management) विद्यार्थी भारतातील तसेच परदेशातील प्रमुख कंपन्यांमध्ये सर्वोत्तम पॅकेजेसच्या शोधत आहेत जिथे तांत्रिक टाळेबंदी जोरात सुरू आहे. तर, कर्मचारी कपातीमध्ये फ्रेशर्सनाही काही अंशी काढण्यात आलेले आहे, तसेच स्टार्टअपमध्ये झालेल्या कपातीत अनेक फ्रेशर्सना काढण्यात आल्यामुळे त्यांच्यापुढे नवी नोकरी कशी मिळवावी हा प्रश्न पडला आहे.

आयटी इंडस्ट्रीवरील परिणाम (Impact on IT Industry)

अनुभवी टेक प्रोफेशनल पुन्हा एकदा कामाच्या शोधात आहेत, मात्र बाजारात नोकऱ्यांची कमी आहे. तसेच ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, त्यांच्या पगाराची रक्कम कमी आहे. तर, अनेक आयटी कर्मचारी इतर स्किल्स शिकून दुसऱ्या क्षेत्रात नोकरी शोधत आहेत.  या कर्मचारी कपातीचा एकूण अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम झालेला नाही, कपातीमुळे कंपन्या कॉस्ट कटिंग करत आहेत. यामुळे कंपन्यांच्या इतर जाहिरात, मार्केटींग खर्चावर परिणाम झालेला नाही. त्यामुळे ग्राहक तसाच ठेवण्यात कंपन्यांना यश मिळू शकते. जरी बिग टेकने 1 लाख कामगारांना कामावरून काढून टाकले, तरीही ते तंत्रज्ञान कर्मचार्‍यांचा एक अंश असेल. नोंदवलेले आकडे मोठे वाटू शकतात, परंतु ते सहसा एकूण पगाराच्या खर्चाचे किंवा एकूणच कर्मचार्‍यांचे प्रमाण म्हणून नोंदवले जात नाहीत. काही टेक कंपन्यांसाठी, ते महामारीच्या काळात सुरुवातीला सुरक्षित केलेल्या मोठ्या प्रमाणात नवीन नियुक्त्यांचा फक्त एक अंश आहेत. बिग टेक अजूनही एक मोठा नियोक्ता आहे आणि त्याची मोठी उत्पादने आपल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रभाव टाकत राहतील.

टेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला आहे, टार्गेट वाढले आहे त्याचबरोबर कामाचे तास वाढले आहेत. यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. मात्र, डोक्यावर कपातीची तलावर असल्यामुळे आणि बाजारात मंदीमुळे नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव काम करावे लागत आहे, असे इंडि 24 च्या आयटी इंडस्ट्री रिपोर्टमध्ये नमूद केलेले आहे.