• 31 Mar, 2023 07:56

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swing trading: स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय आणि त्यासाठी रणनिती कशी बनवली जाते?

What is Swing trading

Swing trading: स्विंग ट्रेडिंगची तुलना झोपाळ्यासोबत केली जाते. झोक्याप्रमाणे बदलणाऱ्या शेअरच्या किंमतीमध्येही योग्य रणनिती बनवून ट्रेडिंग करतात आणि त्यातून नफा कमावला जातो याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात. या स्विंग ट्रेडिंगबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

What is Swing trading: शेअर बाजार गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने कोसळत आहे. या घसरणीच्या काळातही अनेकजण स्वत:चा फायदा करून घेत आहेत. मार्केट सतत वर खाली होत आहे. गेल्या आठ दिवसात मार्केट स्थिरावलेले नाही, अशावेळी अनेक शेअर मार्केट सल्लागार स्विंग ट्रेडिंगबाबत सांगत आहेत, स्विंग ट्रेडिंगची रणनिती सांगताना सोशल मिडियावर दिसत आहेत.

स्विंग म्हणजे झोपाळा, झोपाळा कसा एकदा जमिनीकडे येतो, एकदा उंच आकाशात जातो तसेच शेअरच्या किंमतीही झोक्याप्रमाणे  बदलत असतात. अर्थात, शेअर्सच्या बदलणाऱ्या किंमतींना स्विंग म्हटले जाते तर या स्विंगचा फायदा करून घेणारे किंवा अशा स्थितीत ट्रेड करण्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात.

स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? (What is Swing Trading?)

स्विंग ट्रेडर्स कमी कालावधीत शेअर्सच्या बदलणाऱ्या किंमतीमधूननफा मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे निर्णय हे मुख्यत्त्वे बाजारातील ट्रेंडवर आधारित असतात, मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून, अल्पावधीत संभाव्य उलथापालथींचा विचार करून ट्रेडिंगची रणनिती बनवून त्यानुसार खेळी खेळतात.

सौदा करण्यापूर्वी स्विंग ट्रेडर्सना काही दिवस आणि काहीवेळा आठवडे अशा अल्प कालावधीसाठी गुंतवणूक करतात. ते डे ट्रेडर्सप्रमाणे मार्केट ट्रेंडचे अनुसरण करत नाहीत, परंतु ट्रेंड लाईनमधील बदल ओळखण्यासाठी तत्पर असतात आणि स्थिती उलटी वळण घेण्यापूर्वी बाजारातून बाहेर पडतात, हे स्विंग ट्रेडिंग तंत्र त्यांना अवगत असते. यामुळेच ते अशा स्थितीतही नफा कमावू शकतात.

स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय? (What is a Swing Trading Strategy?)

स्विंग ट्रेडर्स रणनीती तयार करण्यासाठी बॉलिंगर बँड्स, फिबोनाची रिट्रेसमेंट्स, मूव्हिंग ऑसिलेटर यांसारखी लोकप्रिय ट्रेडिंग टूल्स वापरतात. याव्यतिरिक्त, व्यापारी उदयोन्मुख नमुन्यांवर जसे की मल्टी-डे चार्टवर बारीक नजर ठेवतात.

व्यापार्‍यांना माहित आहे की स्टॉकची स्थिती बदलण्यापूर्वी विविध स्तरांमधून जातो. फिबोनाची रिट्रेसमेंट आणि इतर टूल्समुळे स्टॉकची पातळी ओळखण्यात मदत ट्रेडर्सना मदत मिळते. व्यापारी 23.6 टक्के, 38.2 टक्के आणि 61.8 टक्के संभाव्य डाउनसाइड पातळी ओळखण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर पडताळून घेतात आणि स्टॉकची सद्यस्थिती, नजिकच्या भविष्यातील स्थिती जाहिर करतात. यात स्टॉकच किती टक्क्यांनी वधारेल - खालावेल हे सांगितलेले असते. उदाहरणार्थ, ट्रेंड खाली असताना, 61.8 फिबोनाची रेषेवर दिसल्यास ट्रेडर्स स्टॉक खरेदी करून ठेवतात. जी एक प्रतिकार पातळी म्हणून कार्य करते, जिथे किंमत बाऊन्स होण्यापूर्वी थांबते आणि जेव्हा किंमत 23.6 वर बंद होते. फिबोनाच्या लाईनला स्पर्श करते. त्यावेळी ट्रेडर्स आपले स्टॉक फायदा कमावून विकू लागतात.

स्टॉक मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग करण्यापूर्वी शेअर बाजारावर लक्ष ठेवले जाते. बातम्यांमधून किंवा इतर स्त्रोतांकडून, काही शेअर्सबद्दल  माहिती मिळेल त्यापैकी काही आवडते शेअर्स बुकमार्क करू शकता किंवा त्यांना तुमच्या सूचीमध्ये जोडू शकता.
आता तुम्ही त्या शेअर्सचा इतिहास पहा आणि त्यांचे मूल्य किती वेगाने आणि कोणत्या कालावधीत वाढत आहे याचे विश्लेषण करा. हे तुम्हाला त्या शेअरची पैसे गुंतविण्याचा निर्णय घेण्यास मदत करेल.

शेअर ज्या कंपनीचा आहे त्यात काय चालले आहे. त्या कंपनीचा काही नवीन करार होणार आहे की काही तोटा होणार आहे. त्या कंपनीशी संबंधित प्रत्येक बातमीवर बारीक नजर ठेवावी लागते. एखादी कंपनी येत्या काही दिवसात चांगली होणार आहे किंवा त्यांच्यात डील वगैरे आहे हे कळल्यावर लगेच त्या कंपनीचे काही शेअर्स विकत घेऊन ते धरून ठेवा. त्यानंतर तुम्हाला काही दिवस किंवा एक दिवस वाट पहावी लागेल आणि त्या कंपनीचे शेअर्स वाढताच तुम्ही ते विकता. त्यामुळे फक्त अशाप्रकारे स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवून तुम्ही अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवून भरपूर पैसे कमवू शकता.