Before Opening Bell: आज 1 मार्च, नवा महिना सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती. नव्या महिन्याच्या पहिल्या दिवशीही बाजाराच्या स्थितीत विशेष काही बदल दिसण्याचे संकेत नाहीत. एसजीएक्स निफ्टी (SGX Nifty : Singapore Exchange) आणि परदेशी बाजारांच्या संकेतांवरून असे दिसते की गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेला घसरणीचा कल आजही बाजारात कायम राहील. जीडीपीचे आकडे कालच आले आहेत, त्यांनीही त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? (What could affect the market today?)
एसजीएक्स निफ्टीमध्ये घसरण होतहोती, मात्र, बाजाराच्या अखेरिस 0.23 टक्क्यांनी वाढून बंद झाला. त्याचबरोबर, परदेशी बाजारातही दबाव दिसून आला आहे. डाऊ जोन्स (New York Stock Exchange) 232.39 अंकांनी अर्थात 0.71 टक्क्यांनी घसरून बंद झाला. युरोपचे बाजारही काल लाल चिन्हाने बंद झाले. आज आशियाई बाजारातही दबाव कायम आहे. आज बाजार डिसेंबर तिमाहीच्या जीडीपी (GDP: Gross domestic product) आकडे आणि ऑटो सेक्टर विक्रीच्या आकडेवारीवर प्रतिक्रिया देईल. जीडीपीचे आकडे कालच आले आहेत जे अपेक्षेपेक्षा कमी आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत विकास दर 4.4 टक्क्यांवर आला आहे. जीडीपीमध्ये तीव्र घसरण मुख्यत्वे उत्पादन क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे झाली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या याच तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 11.2 टक्के दराने वाढली होती. त्याच वेळी, चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत आर्थिक विकास दर 6.3 टक्के होता. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात 1.1 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. तसेच, मिडिया रिपोर्टनुसार आज एक ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम बाजारातील व्यवहारावर होऊ शकतो.
गेल्या सत्रात काय घडले होते? (What happened in last session?)
सेन्सेक्स 326.23 अंकांनी घसरून 58962.12अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 88.75 अंकांनी घसरून 17,303.95 अंकांवर क्लोज झाला. सेन्सेक्स 0.55 टक्के आणि निफ्टी 0.51 टक्क्याने घसरला.
फेब्रुवारीच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी बाजारात घसरण सुरूच राहिली, सलग आठ दिवस बाजार घसरणीसह बंद होतहोता. चार्टवरील मागील दिवसांच्या कामगिरीच्या आधारे, एनएसई निफ्टी 0.51 टक्क्यांनी म्हणजेच 88.75 अंकांनी घसरून, 17 हजार 303.23 अंकांवर बंद झाला होता. तर, दुसरीकडे बीएसई सेन्सेक्स 326.23 अंकांनी अर्थात 0.55 टक्क्यांनी घसरला आणि 58 हजार 962.12 अंकांवर बंद झाला.
मनीकंट्रोल अहवालानुसार, मंगळवारी, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII: Foreign Institutional Investors) 4 हजार 559 कोटी रुपयांचे शेअर्स विकले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII: domestic institutional investors) 4 हजार 610 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत.
पॉवर ग्रिड, डाबर इंडिया, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, भारती एअरटेल आणि कोलगेट पामोलिव्ह हे कालच्या व्यापारात चढत्या क्रमात दिसले होते. फ्युचर अँड ओपिनियनचे संकेत पाहता, एस्कॉर्ट्स, पॉलीकॅब इंडिया, गुजरात गॅस, एसीसी आणि म्फॅसिसमध्ये लाँग बिल्ड अप दिसत आहे. दुसरीकडे, अल्केम लॅब, नेस्ले इंडिया, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स, दोन्ही खुल्या व्याज आणि शेअरच्या किमती घसरत आहेत. तर, सिप्ला, वेदांत, एचसीएल टेक, कोल इंडिया आणि एलटीआय माइंडट्री आणि अदानी एंटरप्रायझेस, पॉवर ग्रिड, सिटी युनियन, एमसीएक्स इंडिया आणि आरईसीमध्ये शॉर्ट कव्हरिंग होते.
इंटिग्रेटेड कोअर स्ट्रॅटेजीजने मोठ्या प्रमाणात डीलद्वारे बायोकॉनमधील सुमारे 81 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. तर आज एचसीएल टेक, अनुपम रसायन, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, इंडियन एनर्जी एक्सचेंज, ओरोबिंदो फार्मा, एस्कॉर्ट्स कुबोटा. क्लीन सायन्स, सीमेन्स, पर्सिस्टंट सिस्टम्स, सॅफायर फूड्स, आयशर मोटर्स आणि भारत फोर्जचे व्यवस्थापन गुंतवणूकदार आणि विश्लेषकांना भेटत आहेत. याशिवाय पॉवर ग्रिड, झायडस लाइफसायन्स, टाटा पॉवर, व्होडाफोन आयडिया, भरक इलेक्ट्रॉनिक्स, संवर्धन मदरसन, सीमेट, अदानी एंटरप्रायझेस आणि दिल्लीवेरी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत, ही माहिती सीएनबीसी आवाजने प्रसिद्ध केली आहे.