आज रिलिज झालेला ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkaar) या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगव्दारे शानदार कमाई केल्याने, हा चित्रपट आज म्हणजे ओपनिंग डे ला बाॅक्स आॅफीसवर कमाल करेल असा अंदाज काही चित्रपट विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पठाणनंतर हा बाॅलिवुड चित्रपटदेखील सुपर-डुपर हीट ठरतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तू झूठी मैं मक्कारचे कमी वेळेत करोडों रूपयांचे कलेक्शन
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व श्रध्दा कपूर (Shraddha Kapoor) ही बाॅलिवुड जोडी बाॅक्स आॅफीसवर सुपरहीट ठरली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास यशस्वी झाला आहे. रिलिज होताच या चित्रपटाने बाॅक्स आॅफीसवर तब्बल करोडों रूपयांची कमाई केली आहे. फिल्म विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, बुधवार, 8 मार्च 2023 ला ओपडिंग डे वर सकाळी साडे दहा वाजेपर्यंत या चित्रपटाने जवळपास 2.35 करोड रूपयांची कमाई केली होती. पीव्हीआरला 1.23 करोड रूपये, आयनाॅक्सला 70 लाख रूपये तर सिनेपाॅलिसला 42 लाख रूपयांचे कलेक्शन केले होते.
पहिल्याच दिवशी बंपर कमाई होण्याची शक्यता
फिल्म विश्लेषक तरण आदर्श यांनी हे आकडे फक्त तीन थिएटरचे दिले आहेत. ते सकाळपर्यंतचे हे आकडे आहेत. त्यामुळे एक अंदाज लावता येईल की, या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळाली आहे. होळीमुळे या चित्रपटाला सकाळी गर्दी कमी होती, पण संध्याकाळच्या वेळेला हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरला नक्कीच गर्दी होईल अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली.
रणबीर कपूर व श्रध्दा कपूर पहिल्यांदा एकत्रित
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटानिमित्त बाॅलिवुडचे टाॅप स्टार रणबीर कपूर व श्रध्दा कपूर पहिल्यांदा एकत्रित मोठया पडदयावर प्रेक्षकांना पाहण्याची संधी आहे. यापूर्वी त्यांनी एक ही चित्रपट केलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही मोठी ट्रीट आहे. लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या दिग्दर्शकाने यापूर्वी प्यार का पंचनामा, प्यार का पंचनामा 2, सोनू के टीटू की स्वीटी असे अनेक चित्रपट केले आहेत. त्यांचे हे सर्व चित्रपट बाॅक्स आॅफीसवर सुपरहीट झाले आहेत. त्यामुळे रणबीर कपूर व श्रध्दा कपूर या जोडीचा हा चित्रपटदेखील बाॅक्स आॅफीसवर कमाल करण्याच्या तयारीत आहे.